Categories: करमाळा

टाकळी येथे जलजीवन मिशन‌ अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते भुमीपुजन

 

 

 

 

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील टाकळी येथे आ. संजयमामा शिंदे यांच्या हस्ते आज ८८ लक्ष निधी मंजूर असलेल्या जलजीवन मिशन योजनेचे भूमीपुजन झाले. बारामती ऍग्रो चे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यावेळी अध्यक्षस्थानी होते .

शुक्रवारी (ता. ९) हे भूमीपूजन झाले. प्रास्ताविक गुळवे यांनी केले. गुळवे म्हणाले, गावातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन लोकवर्गणी करत संपूर्ण गावात मुरमी करण करत अश्वासन पूर्ण केले आहे. टाकळीतील आठवडी बाजाराच्या जागेबाबतचा प्रश्न गुळवे यांनी मांडला. त्यावर आमदार शिंदे यांनी कंदरप्रमाणे येथे आठवडी बाजार भरेल असे नियोजन करण्याचे अश्वासन दिले आहे. राष्ट्रवादीचे नेते आजित दादा पवार, आमदार रोहीत पवार यांच्या माध्यमातून डीकसळ पुलासाठी निधी मिळाला आहे. आमदार शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे हे काम लवकरच होईल, असा विश्वास व्यक्त केला.

अॅड. अजित विघ्ने म्हणाले, आमदार शिंदे यांच्या माध्यमातून तालुक्यात विकास कामे केली जात आहेत. त्याच जोरावर शिंदे २०२४ ला आमदार होतील.

सामाजिक कार्यकर्ते सुहास गलांडे म्हणाले, ‘मीशन जल जीवन योजनेचे काम चांगले करुन घ्या. ८८ लाख रुपयांच्या या योजनेचे सोने करुन घ्या. याला निधी सरकार देत असले तरी हा पैसा आपल्या खिशातुन जाणार आहे. याची जाणीव ठेऊन काम करुन घ्या, असे सामाजिक कार्यकर्ते सुहास गलांडे यांनी सांगितले आहे. डिकसळ पुलाचे काम विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्या माध्यमातून आमदार संजयमामा शिंदे यांनी मंजूर करुन घेतले आहे. हे काम झाल्यानंतर २०२४ मध्ये मामा तुम्हाला प्रचंड मंत मिळवून दिली जातील. नवीन पुल होणार असला तरी जुन्या पुलाची दुरुस्ती व्हावी म्हणून अडीच कोटीची मागणी केली आहे. शिंदे बंधू हे कमी बोलून कामे जास्त करतात. येथे ऊसाची अडचण नाही. गुळवेंच्या माध्यमातून तो प्रश्न सुटला आहे, असे गलांडे यांनी सांगितले आहे.

यावेळी गौरव झांजुर्णे, नागनाथ लकडे, सुग्रीव धोडमीसे, राजेंद्र धांडे, उद्धव माळी, मोहन गुळवे, हरीभाऊ गुळवे, गणेश कोकटे, पोपट कर्चे, सुनिल ढवळे, गणेश जाधव, मनोहर हंडाळ, दतात्रय लाळगे, अविनाश मोटे, सुनिल तानवडे, तानाजी पानसरे, नितीन इर्चे, संतोष गुळवे, रयत क्रांतीचे जिल्हाध्यक्ष संतोष वारगड, हभप झेंडे महाराज, संतोष झेंडे, संतोष जाधव, अविनाश मोरे, सरपंच शरद भोसले, सोमनाथ पाटील, बापू जाधव, दिलीप गलांडे, अॅड. रविंद्र कोकरे, भारत धायगुडे, जालिंदर कोकरे, रोहिदास गिरंजे, सुनिल शितोळे, भरत धायगुडे, सतिष कोकरे, राजाभाऊ कोकरे आदी उपस्थित होते.

 

saptahikpawanputra

Recent Posts

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

13 hours ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

15 hours ago

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

2 days ago