करमाळा प्रतिनिधी
मकाई निवडणुकीत अपात्र ठरवण्यात आलेल्या १४ उमेदवारांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने आम्हाला दिलासा देऊन, करमाळयात सुनावणी घेऊन ती पुर्ण झाली असुन, आमचे सर्व अर्ज पात्र होतील, असा विश्वास *मकाई परिवर्तन पॅनल* चे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर यांनी बारा बंगले येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला. याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले की, न्यायालयाने निवडणुक प्रकियेबाबत प्रशासनाला ताशेरे ओढले असून, आम्ही दाखल केलेल्या रीट याचिकांवरती माननीय न्यायाधीश यांनी असे आदेश पारित केलेले आहेत की, रिटर्निंग ऑफिसरने ज्या कारणाने अर्ज नामंजूर केलेले आहेत, त्या कारणाविषयी अर्जदाराला कारखान्याच्या उपविधी प्रमाणे त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली नाही.
याबाबत उच्च न्यायालयाने आम्हाला दिलेल्या सूचनेनुसार निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासमोर आमचे म्हणणे प्रभावीपणे मांडण्यात आले असून, याबाबत आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. आम्ही सर्व नियम व अटी पूर्ण केले असून, याबाबतचे पुरावे दाखल केले असल्यामुळे सर्व अर्ज मंजूर होतील असा आम्हाला विश्वास आहे. या बाबतचा निकाल सोमवारी येणार आहे. या काला बाबत आमचे समाधान झाले नाही तर प्रादेशिक सहसंचालक यांच्याकडे आम्हाला जाण्याचा मार्ग मोकळा आहे. त्यामुळे निवडणूक अटळ असून काही दिवस पुढे ढकलण्याची शक्यता आहे. अपात्र उमेदवारांन विषयी सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी काय निर्णय घेणार, याकडे तालुकावासियाचे लक्ष लागले आहे.
सदर पत्रकार परिषदेला लालासाहेब जगताप सर, मकाई चे माजी संचालक सुभाष शिंदे, हरिभाऊ झिंजाडे, माजी चेअरमन श्री. वामन नाना बदे तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्री. रवींद्र गाडगे तसेच दीपक नानासाहेब शिंदे, बापू फडतरे, अमोल घुमरे, बापू सुरेश वाडेकर, बलभीम दहाडे, अशोक लवंगारे, भाऊसाहेब झोळ, सुदर्शन शेळके, तसेच पोथरे येथील संतोष नारायण वाळुंजकर, अशोक उत्तम जाधव, मारुती बोबडे, बापू माणिक फडतरे, युवराज दिगंबर जाधव, विष्णू वाघमोडे तसेच वाशिंबे गावचे माजी सरपंच श्री. भगवान डोंबाळे, काँग्रेस ओबीसी करमाळा तालुका अध्यक्ष श्री गफुरभाई शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…