Categories: करमाळा

नाशिक सायकलिस्टस फाऊडेंशनची अविस्मरणीय भक्तिरसमय पर्यावरणपुरक सायकल दिंडी वारी प्रेरणादायी -डॉक्टर तानाजी जाधव

करमाळा प्रतिनिधी नाशिक सायकलिस्टस फाऊडेंशनच्या अविस्मरणीय भक्तिरसमय पर्यावरणपुरक सायकल वारीचा उपक्रम प्रेरणादायी असे मत टायगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर तानाजी जाधव यांनी व्यक्त केले. भौतिक सुखाचा सागर असताना परमेश्वराची आस कायम ठेवून विठ्ठलाच्या भक्ती सागरामध्ये आपल्याला सामावुन घेत गरीब श्रीमंत सुशिक्षित अशिक्षित धर्म जात पंथाच्या पुढे जाऊन मानवता शिकवणारी पांडुरंगाची पंढरीची वारी आहे. नाशिक ते पंढरपूर जाणाऱ्या सायकल दिंडीचे स्वागत टायगर ग्रुप करमाळा यांच्या वतीने धनश्री हॉटेल करमाळा येथे भव्य दिव्य स्वरूपात करण्यात आले यावेळी नाशिक सायकलिस्ट दिंडी प्रमुख किशोर माने सायकलिस्ट सचिन नरोटे चंद्रशेखर मुळे अविनाश लोखंडे यांच्यासह साडेतीनशे ते चारशे सायकल स्वरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात येऊन पाणी लस्सीचे वाटप करण्यात आले. नाशिक ते पंढरपूर सायकल दिंडीचे यंदाचे अकरावे वर्ष आहे. नऊ जून रोजी निघालेली की सायकल दिंडी 11 जून रोजी पंढरपूरला जाणार आहे. या सायकल दिंडीमध्ये शेतकरी डॉक्टर वकील इंजिनियर उद्योजक तहसीलदार उपजिल्हाधिकारी कामगार असा विविध क्षेत्रातील मान्यवराचा या दिंडीमध्ये सहभाग आहे.या दिंडीचे प्रमुख मार्ग ठिकाणी स्वागत करण्यात आले. यावेळी टायगर ग्रुपचे मनसेचे अध्यक्ष नाना मोरे उद्योजक भरतभाऊ अवताडे शिवराज भाऊ चिवटे लखन आमटे ईश्वर साने प्रफुल शिंदे बाळासाहेब कांबळे प्रशांत राजेभोसले युवा नेते अमोल परदेशी जगदीशसिंह परदेशी पत्रकार दिनेश मडके कृष्णा फुटाणे अकिब सय्यद सोहेल पठाण संभाजी होनप प्रसाद निंबाळकर बबलू पठाण देवा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

21 hours ago

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

3 days ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

3 days ago

पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचा सहकुटुंब सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील‌ उद्योजक क्लासिक कंपनीचे ‌ मालक ‌ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…

3 days ago

निमगाव (ह )येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर अल्पदरात चष्म्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…

4 days ago