करमाळा प्रतिनिधी – देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांचा नऊ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत आहे, या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोदी @9 विशेष जनसंपर्क अभियान देशभरात राबविण्यात येत आहे, याच पार्श्वभूमीवर करमाळा भाजपा संपर्क कार्यालय येथे लोकसभा प्रवास प्रभारी जयकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली,
या बैठकीमध्ये जयकुमार शिंदे यांनी भाजपाच्या मोदी @9 या कार्यक्रमाचे नियोजन कसे करावे व हे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले,
तसेच भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी मोदी @9 चे सर्व कार्यक्रम हे मोठ्या प्रमाणात राबवणार असून मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी गेल्या नऊ वर्षामध्ये देशाचा केलेला विकास जनतेपर्यंत पोहोचवणार असल्याचे सांगितले,
या बैठकीसाठी जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे, मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक हरिभाऊ झिंजाडे, आजिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक विठ्ठलराव शिंदे, राज्य परिषद सदस्य बाळासाहेब कुंभार, बिटरगाव चे सरपंच अभिजीत मुरूमकर, वंजारवाडीचे सरपंच प्रवीण बिनवडे, जातेगाव चे सरपंच छगन ससाने ,वाशिंबेचे उपसरपंच अमोल पवार, तालुका प्रसिद्धी प्रमुख जयंत काळे पाटील, नितीन झिंजाडे, मच्छिंद्र फंड, संजय अण्णा घोरपडे,जितेश कटारिया, महिला आघाडीच्या राजश्री खाडे, संगीता नष्टे , सोमनाथ घाडगे, धर्मराज नाळे, , किरण शिंदे, विष्णू रणदिवे,राजू पवार ,प्रकाश ननवरे ,किरण बागल, संदीप काळे ,नितीन निकम, नानासाहेब अनारसे, राजेश पाटील,विशाल घाडगे,अजय डौले, हर्षद गाडे, दत्तात्रय गाडे, सुनील जाधव, भैया कुंभार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…