गुणवंत विद्यार्थी हे देशाचे उद्याचे भविष्य असून त्यांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्वतोपरी सहकार्य करणार – दिलीप धोत्रे

करमाळा प्रतिनिधी गुणवंत विद्यार्थी हे देशाचे उज्वल भविष्य असून त्यांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्राचे नेते दिलीप धोत्रे यांनी व्यक्त केले. करमाळा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळा यांच्यावतीने करमाळा शहर  तालुक्यातील दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन गुरूप्रसाद मंगल कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करमाळा तालुक्याचे विकासप्रिय आमदार संजय मामा शिंदे महाराष्ट्र नेते मनसे दिलीप बापू धोत्रे टायगर ग्रुप अध्यक्ष महाराष्ट्र तानाजी भाऊ जाधव सोलापूर जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे जगताप गटाचे नेते शंभूराजे जगताप सावंत गटाचे नेते सुनील बापू सावंत सामाजिक कार्यकर्ते उद्योजक भरत भाऊ अवताडे श्रेणिकशेठ खाटेर नगरसेवक प्रवीण आबा जाधव युवा नेते अमीर तांबोळी युवा नेते संतोष वारे मानसिंग खंडागळे आशपाक जमादार देवीचामाळचे मा. सरपंच अनिल पवार टायगर ग्रुप चे अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर जगताप गटाचे युवा नेते शंभूराजे जगताप सावंत गटाचे नेते सुनील बापू सावंत सामाजिक कार्यकर्ते श्रेणिक खाटेर ‍उद्योजक भरत भाऊ अवताडे अर्बन बँकेचे माजी संचालक शिवराज भाऊ चिवटे युवा नेते अमोल परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना दिलीप धोत्रे म्हणाले की गुणवंत विद्यार्थी हे देशाचे पुढील भविष्या असून भारताला महासत्ता बनवण्याचे काम ही पिढी करणार असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज साहेब ठाकरे यांच्या विचारांना अनुसरून समाजातील चांगल्या गोष्टीला प्रोत्साहन देऊन .समाजामध्ये बदल घडवण्यासाठी मनसे कार्यरत आहे. समाजाला योग्य दिशा देण्यासाठी उज्वल भविष्य साठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना काम करत असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठीशी सर्वांनी उभे राहणे ही काळाची गरज आहे समाजातील विषमतेची दरी कमी करून भारताला महासत्ता बनवण्यासाठी आधुनिक विचारांची कास्ट करून संस्कारक्षम पिढी घडवणे यासाठी राजकीय पक्षांनीही कौतुकाची थाप विद्यार्थ्यांच्या पाठीवर घेणे आवश्यक असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना माणुसकी हाच खरा धर्म याचे तंतोतंत पालन करत असल्याने जनता मनसेच्या पाठीशी खंबीर पण उभे राहील विश्वास त्यांनी व्यक्त केला करमाळा तालुक्याचे आमदार संजय मामा शिंदे आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की माझ्या यशामध्ये मनसेचा महत्त्वाचा वाटा असून मनसेच्या कार्यास आपण सर्वतोपरी सहकार्य करू दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा स्तुत्य उपक्रम आहे. मनसेच्या समाज उपयोगी उपक्रमाचा इतर राजकीय पक्षांनी नेत्यांनी आदर्श आदर्श घेणे ही काळाची गरज आहे या कार्यक्रमाची यशस्वीपणे आयोजन मनसे तालुकाध्यक्ष संजय बापू घोलप मनसे शहराध्यक्ष नानासाहेब मोरे यांनी केले गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.मनसे तालुकाप्रमुख संजय बापू घोलप व सर्व मनसे व सर्व शिक्षक वर्ग व विद्यार्थ्यांचे पालक पदाधिकारी आभार मनसे शहराध्यक्ष नानासाहेब मोरे यांनी मानले.

saptahikpawanputra

Recent Posts

प्राचार्य मिलिंद फंड यांना जीवनगौरव पुरस्कार पद्मश्री ‘बिजमाता’ राहिबाई पोपेरे यांच्या हस्ते सन्मान; वसंतराव दिवेकर स्मृतिदिनानिमित्त वसंत महोत्सव उत्साहात

करमाळा  प्रतिनिधी करमाळा येथील यशकल्याणी सेवाभवन येथे श्री. वसंतराव दिवेकर यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित ‘वसंत…

51 mins ago

करमाळ्यात झेडपी शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून सेमी-इंग्लिश अभ्यासक्रमाचा विस्तार;* प्रस्ताव सादर करण्याचे भाजप नेते दिग्विजय बागल यांचे आवाहन

  करमाळा प्रतिनिधी, करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये मराठी माध्यमासोबत इयत्ता पहिलीपासून सेमी-इंग्लिश अभ्यासक्रम…

5 hours ago

करमाळ्यात श्री कमलाभवानी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवास भक्तिमय वातावरणात प्रारंभ! विधिवत घटस्थापना; सनई, ढोल, संबळ आणि झांजांच्या निनादात देवीची आरती संपन्न

  करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कमला भवानी देवी मंदिरात शारदीय…

7 hours ago

मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रानंतर निदर्शन आंदोलन स्थगित- वैभवराजे जगताप.

करमाळा - प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६…

3 days ago

भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिमची करमाळा येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न पदयात्रेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

  करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…

4 days ago