करमाळा प्रतिनिधी आषाढी वारीच्या पाश्वभुमीवर करमाळा शहराजवळील ‘श्रीदेवीचामाळ रस्त्याचे काम स्थानिकामुळे रखडल्याने ठेकेदार प्रशासन हतबल झाले आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर गावात येणाऱ्या दिंडी वारकऱ्यांच्या सोयीसाठी करमाळा तालुक्यातील करमाळा ते आवाटी रस्त्याचे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये आत्तापर्यंत रस्त्याचे 50.54 किमी पैकी 44. 50 किमी काम पूर्ण झालेले आहे एक किलोमीटर लांबीचे रस्त्याचे काम बऱ्याच दिवसापासून रखडले आहे. यामुळे नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे याबाबत एन पी इन्फ्रास्ट्रक्चरचे मालक पी एम रामबाबू यांना याबाबतीत विचारले असता त्यांनी असे सांगितले आहे की स्थानिक लोकांचा हस्तक्षेप कामात असल्यामुळे प्रशासन व ठेकेदार यामध्ये मोठा संघर्ष निर्माण झाला आहे.येथील स्थानिक लोकांची मागणी आहे की श्रीदेवीचा माळ ते बायपास पर्यंत सात फूट फूटपाथ करून देण्यात यावा वास्तविकपणे ही मागणी स्थानिक लोकांनी प्रशासनाकडे करून पाठपुरावा करणे गरजेचे आहे. असे असताना स्थानिक प्रतिनिधी लोकामार्फत कोणत्याही कारणावरून कामे बंद पाडली जात आहेत. श्रीदेवीचामाळ बायपास चौकातील रुंदीकरण काम नगरपालिका पाईपलाईन आरसीसी गटारीचे काम विद्युत खांब शिफ्टिंगचे काम स्वतःच्या स्वार्थासाठी बंद केली जात आहे त्यामुळे करमाळा गावातील रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे सध्या कोर्टी ते आवाटी रस्त्याचे कामाची मुदत माहे जून 2023 अखेरपर्यंत आहे स्थानिक लोकामार्फत कामे शुल्लक कारणावरून अडवली जात असल्याने ठेकेदारला काम करणे अवघड झालेले आहे. याबाबत ठेकेदारांनी प्रशासनाला कळवले आहे त्यामुळे करमाळा लगत असणारा करमाळा आवाटी रस्ता असणाऱ्या श्री देवीचामाळ जवळील करमाळा शहरालगतचा एक किलोमीटरचा रस्ता पूर्ण होणार का? करमाळा टेंभुर्णी रस्त्याप्रमाणेच हा रस्ता अर्धवटच राहणार असा प्रश्न नागरिकांमध्ये पडला आहे.आषाढी वारीच्या निमित्ताने रस्त्याचे काम अर्धवट राहिल्याने वारी निमित्त येणाऱ्या वारकऱ्यांचा त्यांच्या वाहनांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे होणाऱ्या अपघात हानीपासुन सुरक्षीत राहण्यासाठी लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देऊन ‘प्रशासन ठेकेदार स्थानिक नागरिक प्रतिनिधी यांचा समन्वय साधून या रस्त्याचे काम पूर्ण करणे आवश्यक आहे.