करमाळा प्रतिनिधी 15 जून पासून शालेय नवं वर्ष सुरू झाले असून करमाळा शहरातील न्यु इरा इंग्लिश मिडीयम स्कूल करमाळा येथे ज्या विद्यार्थ्यांनी प्रथमच शालेय जीवनाची वाटचाल सुरू केली आहे अशा मुलं- मुलीचे स्वागत शाळेतील जुन्या विद्यार्थ्यांकडून गुलाब पुष्पगुच्छ व चाॅकलेटस देऊन स्वागत करण्यात आले आहे. नवीन विद्यार्थी व त्यांचे पालक अशा वेगळ्या पद्धतीने केलेल्या स्वागतामुळे भारावून गेले व एक वेगळ्या प्रकारचा आनंद नुतन विद्यार्थ्यांच्या चेह-यावर जाणवतं होता . न्यु इरा इंग्लिश स्कूलसाठी समीर शेख (भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन ) यांच्या तर्फे विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण घेत असताना अंकांची ओळख, अक्षरांची ओळख, प्राण्यांची ओळख, आठवडा व महिने यांची ओळख होईल अशा विविध भिंती चित्राच्या माध्यमातून लहान वयातच स्मार्ट विद्यार्थी घडतील असे पोस्टर्स, विद्यार्थ्यांना बेसिक शिक्षणाची पुर्ण माहिती मिळेल व विद्यार्थ्यांनाचा शैक्षणिक पाया पक्का कसा होईल या सारखे उपक्रम न्यु इरा इंग्लिश स्कूलमध्ये राबविण्यात येणार आहेत . यावेळी अजिम मोगल ( न्यु इरा इंग्लिश स्कूल चे अध्यक्ष) यांनी मनोगत व्यक्त करताना नवीन विद्यार्थ्यांना सुरू होणा-या शालेय जीवनाच्या शुभेच्छा देताना संस्थेने आतापर्यंत केलेल्या कामाबद्दल माहिती दिली व विद्यार्थ्यांना शिक्षणा बरोबर खेळाच्या माध्यमातून सदृढ विद्यार्थी घडविण्याचे ठरवले आहे . प्रत्येक विद्यार्थी मध्ये असलेला उणीव व न्यूनगंड अभ्यासुन पालक – शिक्षक यांच्याशी सतत संपर्क ठेवून विद्यार्थ्यांनंच्याशी विश्वासात घेऊन व चर्चा करून प्रत्येक अडचण दुर करण्याचा प्रयत्न केला जाईल अशी हमी देऊन चांगला विद्यार्थी व नागरिक घडवूया अशी इच्छा व्यक्त केली आहे. यावेळी जमीर सय्यद (जामा मस्जिद चे विश्वस्त अध्यक्ष व ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन चे सदस्य ) पै इम्रान (वस्ताद) पठाण, नदीम बागवान ( सिव्हिल इंजिनिअर), मुस्तकीम पठाण ,( युवक नेते व सामाजिक कार्यकर्ते), मुज्मील कुरेशी, इम्रान शेख ( नालबंद ट्रान्सपोर्ट), एजाज शेख, जमील सय्यद व विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होता.