Categories: करमाळा

परिस्थितीची जाणिव ठेवुनच अभ्यास करतात तेच इतिहास‌ घडवतात गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी नायब तहसीलदार बाबासाहेब गायकवाड यांचे प्रतिपादन

शेटफळ प्रतिनिधी  परिस्थितीची जाणीव ठेवून अभ्यास करणारी मुलेच इतिहास घडवू शकतातअसे प्रतिपादन नायब तहसीलदार बाबासाहेब गायकवाड यांनी शेटफळ ता करमाळा येथील जिव्हाळा ग्रूपच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात बोलताना केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच विकास गुंड होते.काही काळापुर्वी प्रशासन व इतर क्षेत्रात उच्च पदावर केवळ प्रास्तापितांचीच मक्तेदारी समजली जात होती परंतु सध्या गरीब शेतकरी शेतमजूरांच्या मुलांना आपल्या बुद्धी व कष्टाच्या जोरावर उच्च पदावर संधी मिळू लागली आहे ही मुलं आपल्या आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून अभ्यास करत आहेत या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते जीवनात यशस्वी होतात.आशा विद्यार्थ्यांच्या पाटीवर कौतूकाची थाप पडणे गरजेचे आहे.शेटफळ येथील जिव्हाळा ग्रुप हे काम नियमितपणे करत असल्याने या ग्रुपचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी व अनुकरणीय आहे. यावेळी गायकवाड यांना पदोन्नती मिळून त्यांची नायब तहसीलदारपदी नियुक्ती झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. धनराज निलचंद दुरंदे याने निट परिक्षेत उत्तम गुण मिळवून वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र ठरल्याबद्दल त्याचा आईवडीलांसह सत्कार करण्यात आला त्याबरोबरच स्कॉलरशिप सह इतर परिक्षेत यश मिळवल्याबद्ल विद्यार्थ्यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत जिव्हाळा ग्रूपचे वैभव पोळ यांनी केले.सत्कारमुर्तींनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला सरपंच विकास गुंड आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक सुरेश पोळ मकाईचे माजी संचालक किरण पोळ माजी सरपंच मुलीधर पोळ अनिल पोळ विजय लबडे नानासाहेब साळूंके संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष सुहास पोळ, राजेंद्र साबळे, विष्णू पोळ , महावीर निंबाळकर, संतोष घोगरे योगेश घोगरे शरद पाटील यांच्यासह ग्रुपचे सदस्य व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिव्हाळा ग्रुपचे गजेंद्र पोळ यांनी केले तर आभार प्रशांत नाईकनवरे यांनी मानलेे.

 

saptahikpawanputra

Recent Posts

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

1 day ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

1 day ago

पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचा सहकुटुंब सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील‌ उद्योजक क्लासिक कंपनीचे ‌ मालक ‌ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…

2 days ago

निमगाव (ह )येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर अल्पदरात चष्म्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…

2 days ago

करमाळा एमआयडीसी मधील भूखंड वाटपास सुरुवात उद्योजकांनी लाभ घ्यावा जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग…

5 days ago