Categories: करमाळा

मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत प्राध्यापक रामदास झोळ यांची एकाकी झुंज परिवर्तन पॅनलने वेधले तालुकयाचे लक्ष .

.करमाळा प्रतिनीधी मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार ऊसवाहतुकदार यांच्या कल्याणासाठी परिवर्तन पॅनलच्या माध्यमातुन निवडणुक लढवली. माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे पाठबळ प्राध्यापक रामदास झोळ सर यांच्या परिवर्तन पॅनलला मिळाले पण या व्यतिरिक्त करमाळा तालुक्यातील पाटील गट शिंदे गट मोहिते पाटील समर्थक भाजप शिवसेना यांनी पुढील सोयीचे राजकारण करून बागल गटाला छुपा पाठिंबा देऊन राजकीय तडजोड केली असल्याचे चित्र या निवढणुकीमुळे स्पष्ठ झाले आहे . मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत प्राध्यापक रामदास झोळसर यांनी शेतकरी कामगार ऊस वाहतूकदार यांच्या .कल्याणासाठी प्रथमच यावेळी परिवर्तन पॅनलचे निर्मिती करून उमेदवार उभा केले होते त्यांचे काही उमेदवारी अर्ज कायदे नियमाच्या अटी शर्तीच्या नावाखाली ते बाद ठरवण्यात आले. ही निवडणूक लागू नये मकाई कारखाना बिनविरोध देण्याची भूमिका सर्व राजकीय गटांनी घेतली असल्याची चित्र स्पष्ट झाली इतर वेळी राजकीय वैर असल्याचे जनतेला दाखवत टीका टिपणी करणाऱ्या सर्व राजकीय नेत्यांची दुट्टपी भुमिका यामुळे उघडी पडली असून प्राध्यापक रामदास झोळ सर यांनी कोणताही मोठा गट बरोबर नसताना एकाकी लढत झुंज शेतकरी कामगार यांच्यासाठी दिली आहे त्यांना पडलेले त्यांना या निवडणुकीत पडलेली मते ही खऱ्या अर्थाने शेतकरी कामगार ऊस वाहतूकदार यांची खरी मते असून सर्वसामान्य जनता त्यांच्या पाठीशी असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. सर्व नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सक्त सूचना देऊन प्राध्यापक झोळ सरांना सहकार्य करू नका अशी भूमिका घेतली होती अशा परिस्थितीत न डगमगता प्राध्यापक रामदास झोळ सरांनी एकाकी लढत देऊन आव्हान उभे केले आहे त्यांच्या भूमिकेचे तालुक्यातील जनतेतून कौतुक होत आहे. शेतकरी कामगार ऊस वाहतूकदार सर्वसामान्य जनतेसाठी लढणारी नेते म्हणून प्राध्यापक प्रा.रामदास झोळ यांची ओळख या निवडणुकीच्या माध्यमातून तालुकावासियांना झाली आहे .प्राध्यापक रामदास झोळ यांचे संपुर्ण जीवनच संघर्षातून यशस्वी झेपेकडे झालेले असून दहावी शिक्षण झाल्यानंतर घरच्यांच्या विरोधाला न जुमानता पळून जाऊन आपले शिक्षण पूर्ण करून पर जिल्ह्यामध्ये जाऊन दत्तकला शिक्षण संस्थेसारखी शिक्षण संस्था उभा करण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या या कार्यात त्यांची आजी व भाऊ पांडुंरंग झोळ धर्मपत्नी मायाताई झोळ यांचे पाठबळ वगळता त्यांना संपुर्ण कुटुंबाचा विरोध असतानाही जिल्हा परिषद ग्रामपंचायत या निवडणुका लढवुन आपली वेगळी ओळख जनतेला करुन दिली. आहे. परिवर्तनाची लढाई लढताना संघर्षातून यशस्वी झेप घेण्याचा रामदास झोळ यांचा पिंड असल्याने करमाळा तालुक्याच्या राजकारणातही सर्वसामान्य जनता शेतकरी यांच्या हितासाठी निवडणूक लढवून स्वार्थी राजकीय पुढाऱ्यांची मक्तेदारी बंद करून करमाळा तालुक्याचे राजकारणात सक्षम पर्याय देऊन करमाळा तालुक्याच्या शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय विकासासाठी समविचारी गटांना बरोबर घेऊन कार्यरत राहणार असल्याचे प्राध्यापक रामदास झोळ सर यांनी सांगितले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट मध्ये माँ साहेब जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती विद्यार्थिनीच्या हस्ते उत्साहात साजरी*

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील प्रा निकत सरांचे ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट मध्ये 12 जानेवारी रोजी माँ…

34 mins ago

राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करमाळा यांच्यावतीने साजरी

करमाळा प्रतिनिधी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या विचारांची खऱ्या अर्थाने समाजाला गरज । असून आदर्श राष्ट्र समाज…

6 hours ago

राष्ट्रीय पातळीवरील साई गुणगौरव समाजभूषण पुरस्कार 2025 चे मानकरी श्री बाळासाहेब नरारे यांना पुरस्कार प्रदान

करमाळा प्रतिनिधी: ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला…

9 hours ago

दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा

करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात…

1 day ago

पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलासाठी ग्रीन झोनमध्ये 2 गुंठे क्षेत्राला बांधकाम परवाना द्यावा. अन्यथा 26 जानेवारी रोजी मा. सभापती सतीश सावंत यांचा उपोषणाचा इशारा

  सांगोला प्रतिनिधी सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम परवाना व…

1 day ago

भाजप युवा मोर्चाच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी शुभम बंडगर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…

2 days ago