Categories: करमाळा

मकाई सहकारी साखर कारखाना निवडणुकीत बागल गटांनी एक हाती सत्ता मिळवत विजयाची परंपरा कायम राखली

करमाळा प्रतिनिधी मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये बागल गटाने आपले आव्हान कायम ठेवत बहुमताने एकहाती विजय मिळवला आहे. मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुक बिनविरोध होईल असे असताना अशा परिस्थितीमध्ये विरोधी गटाचे प्राध्यापक रामदास झोळसर यांनी.परिवर्तन पॅनल तयार करुन उमेदवारी अर्ज भरले होते यामध्ये त्यांचे व सहकार्याचे अर्ज बाद झाल्याने बागलगटाच्या आठ जागा बिनविरोध होऊन नऊ जागी निवडणूक लागली होती या निवडणुकीमध्ये बागल गटाचे नेत्या रश्मी दीदी बागल युवा नेते मकाईचे दिग्विजय बागल यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला नव्हता अशा परिस्थितीमध्ये बागल गट कार्यकर्तेविरुद्ध विरोधी गट म्हणुन प्रा .झोळ परिवर्तन पॅनल असा सामना रंगला होता सुरुवातीपासूनच उमेदवारी अर्जाबाबत लढा चालू होता. अशा परिस्थिती बागल गटाच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचार यंत्रणा समांतर राखुन घराघरापर्यंत चांदा ते बांधापर्यंत प्रचार करून मतदान करून घेतले त्यामुळे बागल गटाच्या उमेदवाराचा विक्रमी मताधिक्याने विजय झाला आहे. बागल गटांनी सुरुवातीस पहिल्या नऊ जागा आत्ताच्या आठ जागा अशा एकुण 17 जागी आपले वर्चस्व प्रस्थापित करत विरोधकांना आपली ताकद दाखवून दिली आहे. बागलगटाला जेव्हा अडचणीत आणण्याचा विरोधी गट प्रयत्न करतो त्यावेळी फिनिक्स पक्षासारखी मोठ्या मताधिक्याने उभारी घेतो हे आजपर्यंतचे उदाहरण आहे.याशिवाय कार्यकर्त्यांनी स्व. दिगंबरराव बागल मामा त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन सर्व ताकद पणाला लावुन रश्मी दिदी बागल दिग्विजय बागल यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक जिंकली आहे. या निवडणुकीमध्ये भिलारवाडी गटामध्ये बागल गटाचे रामचंद्र हाके 8129 अजित झांजुर्ण यांना 8267 मते मिळाली असून विरोधी गटातील उमेदवार सुनीता गिरंजे यांना 1328 आप्पा जाधव 1249 मध्ये मिळाले आहे . पारेवाडी गटामध्ये बागल गटाचे रेवणनाथ निकत यांना 8390 संतोष पाटील यांना 8383 बाळासाहेब पांढरे यांना 8094 मते मिळाली असून उमरड येथील विरोधी गटाचे उमेदवार गणेश चौधरी यांना 1546 मते मिळाली आहे मांगी गटातील बागल गटाचे उमेदवार दिनेश भांडवलकर यांना 8256 अमोल यादव यांना 8166 विरोधी गटातील उमेदवार सुभाष शिंदे यांना 1465 मध्ये मिळाले आहेत. महिला राखीव गटातील बागल गटाच्या कोमल करगळ यांना 8271 अश्विनी झोळ यांना 8232 अशी मते मिळाली असून विरोधी गटातील सुनिता गिंरजे यांना 1435 मते मिळाले असुन बागल गटाचे नऊ उमेदवार विक्रम मताने निवडून आले आहेत. या आधी बागल गटाचे बिनविरोध झालेली उमेदवार चिखलठाण गटातून सतीश नीळ दिनकर सरडे वांगी घाटातून सचिन पिसाळ युवराज रोकडे उत्पादक पणन संस्था प्रतिनिधी नवनाथ बागल भटक्या विमुक्त जाती जमाती मध्ये बापू चोरमले इतर मागास मध्ये अनिल अनारसे अनुसूचित जाती जमाती मधून आशिष गायकवाड हे सुरुवातीलाच बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे एकूण सतरा जागी पैकी सुरुवातीला आठ बिनविरोध व आता नऊ उमेदवार विक्रमी मताधिक्याने विजय झाले आहेत.विजयी झालेल्या सर्व उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी सोपानराव टोपे यांनी निवडणूक विजयाचे नुतन संचालक पदाचे प्रमाणपत्र देऊन अभिनंदन केले आहे .मकाईच्या सर्व यशस्वी उमेदवाराचे अभिनंदन बागल गटाचे नेत्या रश्मी दीदी बागल युवा नेते दिग्विजय बागल मार्गदर्शक विलासराव घुमरे मा.आमदार शामलताई बागल मामी यांनी केले असून विजयानंतर बागलगटाचे उमेदवार त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याच्या बरोबर गुलालाची उधळण करत आनंद उत्सव साजरा केला आहे. 

saptahikpawanputra

Recent Posts

राष्ट्रीय पातळीवरील साई गुणगौरव समाजभूषण पुरस्कार 2025 चे मानकरी श्री बाळासाहेब नरारे यांना पुरस्कार प्रदान

करमाळा प्रतिनिधी: ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला…

38 mins ago

दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा

करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात…

20 hours ago

पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलासाठी ग्रीन झोनमध्ये 2 गुंठे क्षेत्राला बांधकाम परवाना द्यावा. अन्यथा 26 जानेवारी रोजी मा. सभापती सतीश सावंत यांचा उपोषणाचा इशारा

  सांगोला प्रतिनिधी सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम परवाना व…

21 hours ago

भाजप युवा मोर्चाच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी शुभम बंडगर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…

2 days ago

कोल्हापूरच्या पावणे चार वर्षाच्या साम्राज्य मराठे ची सह्याद्रीतील सर्वात कठीण लिंगाणा सुळक्यावर चढाई.

कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…

2 days ago

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी आमदार देशभक्त नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…

2 days ago