करमाळा प्रतिनिधी रिटेवाडी उपसा सिंचन योजनेसाठी माजी आमदार नारायण पाटील यांचा पाठपुरावा सुरु असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. याबाबत सविस्तर माहिती देताना माजी आमदार नारायण पाटील यांनी स्वतः सांगितले की दि 19 जून रोजी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन रिटेवाडी उपसा सिंचन योजनेबाबत बोललो व निवेदनही सादर केले.कुकडी प्रकल्पात करमाळा तालूक्यासाठी 5.5 टि एम सी पाणी राखुन ठेवण्यात आले. परंतु आजपर्यंत एकदाही हक्काचे 5,5 टि एम सी पाणी मिळाले नाही. प्रत्यक्षात केवळ 500 एम सी एफ टी एवढे सुध्दा पाणी मिळत नाही. यामुळे आता नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यात यावी व यास मंजूरी देऊन अंदाजे 80 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला जावा.नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन प्रकल्प हा आपला ड्रीम पोजेक्ट असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदिनाथ कारखाना गाळप हंगाम शुभारंभ कार्यक्रमा दरम्यान बोलताना तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थिती मध्ये ठोस आश्वासन दिले आहे.या योजनेबाबत चिंता करु नका असे सांगून सकारात्मक प्रतिसाद दिला. यामुळे आता पुढील पाठपुरावा सुरु ठेवला असून शासकीय पातळीवर या योजनेसाठी वेगाने हालचाली सुरु आहेत. दहिगाव उपसा सिंचन योजना मी कार्यान्वित केली. त्यावेळेपासून रिटेवाडीसाठी आपण प्रयत्नशील होतो. आता स्वतः मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या दोघांनी या योजनेसाठी हिरवा कंदिल दाखवला आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असणारी कागदोपत्री पुर्तता, मंजुरी, प्रत्यक्षात कार्यस्थळावर सर्वे, कॅबिनेटची मंजूरी, अर्थसंकल्पात तरतुद आदि सर्व प्रक्रिया होई पर्यंत आपण सातत्याने पाठपुरावा चालू ठेवणार असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.तसेच नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजनेस मान्यता मिळून ही योजना कार्यान्वित झाल्यास करमाळा तालुक्यातील आणखी वाढीव क्षेत्र ओलिताखाली येईल. पाण्यापासून वंचित भागास या योजनेचा फायदा होणार आहे. यामुळे आपण ही योजना कार्यान्वित करण्यासाठी सर्व राजकीय ताकद पणाला लावून प्रयत्न व पाठपुरावा करत राहणार असल्याचेही माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.
करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात…
सांगोला प्रतिनिधी सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम परवाना व…
करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…
कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…
करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…