करमाळा(प्रतिनिधी) .21 जून जागतिक योग दिनानिमित्त करमाळा येथील ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट मध्ये योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. इन्स्टिट्यूटच्या सर्व विद्यार्थ्यांना योग करण्याचे फायदे व योग दिनाचे महत्व समजावून देण्यात आले. सकाळच्या सत्रात सर्व इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना एकत्र करून योगा करण्यास लावले होते. यावेळी जिल्हास्तरिय योगा स्पर्धेचे बक्षीस मिळवून राज्यस्तरीय योगा स्पर्धेत निवड झालेली ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट ची विद्यार्थीनी राजलक्ष्मी सुतार आणि गोरक्ष लोंढे तसेच इन्स्टिट्यूट चे विवेक कांबळे सर यांनी प्रात्यक्षिके करून दाखविली. या योगशिबिरास प्रा.महेश निकत सर संस्थापक अध्यक्ष ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट यांनी मार्गदर्शन केले व योगा , व्यायाम चे महत्व पटवून दिले .यावेळी इन्स्टिट्यूट मधील सर्व शिक्षकांनी योग शिबिर पार पाडण्यासाठी सहकार्य केले
करमाळा प्रतिनिधी, करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये मराठी माध्यमासोबत इयत्ता पहिलीपासून सेमी-इंग्लिश अभ्यासक्रम…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कमला भवानी देवी मंदिरात शारदीय…
करमाळा प्रतिनिधी : यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्था, पुणे (शाखा करमाळा) यांच्या वतीने संस्थेचे संकल्पक…
करमाळा - प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६…
करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…
करमाळा प्रतिनिधी भाजप पक्षाच्या कार्यक्रमा निमीत्त करमाळा दौऱ्यावर आले असता मा . आ . जयवंतराव…