संघर्ष हा जीवनाचा अविभाज्य भाग असून जीवनामध्येही संघर्षालाच आपले जीवन मानून यशाची शिखर गाठणारी मानसे आज समाजामध्ये कमी दिसत आहे अशा परिस्थितीमध्ये कुंकू गल्ली येथील वर्धमान पेटकर यांचे उदाहरण नक्कीच प्रेरणादायी आहे.बिगारी कामगार ते मिठाई उद्योजक असा त्याचा यशस्वी प्रवास आहे सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्म घेऊन बिगारी काम करत आपला प्रपंचाचा गाडा ओढत असतानाही त्यांना त्यांची पत्नी यांची साथ लाभली दोन मुले थोरला मुलगा डी फार्मसी सूनही डी फार्मसी झालेली असून दुसरा मुलगा सून वर्धमान पेटकर बरोबर मिठाईचा व्यवसाय करत आहे. छोटे मोठे काम करत आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करत मुलांना शिक्षण देऊन स्वतः मात्र अल्पशिक्षित असतानाही आपली मुले शिक्षित झाली पाहिजे ही भावना उराशी बाळगून वर्धमान पेटकर यांनी संघर्षमय जीवन जगणाऱ्या समाजाला संदेश देण्याचे काम केले आहे.परिस्थितीमध्ये रडत बसण्यापेक्षा स्वतःच्या कर्तुत्वावर विश्वास ठेवून निश्चित देह गाठता येते याचे उत्तम उदाहरण वर्धमान पेठकर यांची आहे आपल्या दुःखाचे परिस्थितीचे भांडवल करण्यापेक्षा आपण आपल्या संघर्षाला ताकद बनवून आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये काम करू शकतो त्याला कुठल्याही गुरूची गरज नाही परिस्थिती हाच खरा गुरु आहे आज मिठाई क्षेत्राची कुठलाही संबंध नसताना सुरुवातीला आचारी लावून वर्धमान पेटकर यांनी फरसाण बनवण्यास सुरुवात केली नंतर मात्र स्वतः फरसाण गुडी शेव जिलेबी लाडू स्वतः करून आठवडा बाजार करून विक्री करत आहे यामुळे वर्धमान यांना चांगला रोजगार भेटला असून मुलगाही हाच व्यवसाय असल्याने उन्नतीचा मार्ग त्यांना सापडला आहे आजच्या युवा पिढीने नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यवसाय करावा उत्तम उदाहरण आहे व्यवसाय परवडत नाही धंद्यात काही खरी नाही आपण धंदा करू शकत नाही या नोंदणी आजची पिढी भरकटलेली आहे त्यामुळे तक्रारीचे पाढे वाचण्यापेक्षा स्वतः काहीतरी करून दाखवा परमेश्वर तेज्यात नक्की एच देतो सचोटी प्रामाणिकता नम्रता याच्या जोरावर सुखी संपन्न आयुष्य जगता येते त्यासाठी आजच्या पिढीने याचा बोध घ्यावा हीच अपेक्षा
करमाळा प्रतिनिधी, करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये मराठी माध्यमासोबत इयत्ता पहिलीपासून सेमी-इंग्लिश अभ्यासक्रम…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कमला भवानी देवी मंदिरात शारदीय…
करमाळा प्रतिनिधी : यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्था, पुणे (शाखा करमाळा) यांच्या वतीने संस्थेचे संकल्पक…
करमाळा - प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६…
करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…
करमाळा प्रतिनिधी भाजप पक्षाच्या कार्यक्रमा निमीत्त करमाळा दौऱ्यावर आले असता मा . आ . जयवंतराव…