संघर्ष हा जीवनाचा अविभाज्य भाग असून जीवनामध्येही संघर्षालाच आपले जीवन मानून यशाची शिखर गाठणारी मानसे आज समाजामध्ये कमी दिसत आहे अशा परिस्थितीमध्ये कुंकू गल्ली येथील वर्धमान पेटकर यांचे उदाहरण नक्कीच प्रेरणादायी आहे.बिगारी कामगार ते मिठाई उद्योजक असा त्याचा यशस्वी प्रवास आहे सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्म घेऊन बिगारी काम करत आपला प्रपंचाचा गाडा ओढत असतानाही त्यांना त्यांची पत्नी यांची साथ लाभली दोन मुले थोरला मुलगा डी फार्मसी सूनही डी फार्मसी झालेली असून दुसरा मुलगा सून वर्धमान पेटकर बरोबर मिठाईचा व्यवसाय करत आहे. छोटे मोठे काम करत आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करत मुलांना शिक्षण देऊन स्वतः मात्र अल्पशिक्षित असतानाही आपली मुले शिक्षित झाली पाहिजे ही भावना उराशी बाळगून वर्धमान पेटकर यांनी संघर्षमय जीवन जगणाऱ्या समाजाला संदेश देण्याचे काम केले आहे.परिस्थितीमध्ये रडत बसण्यापेक्षा स्वतःच्या कर्तुत्वावर विश्वास ठेवून निश्चित देह गाठता येते याचे उत्तम उदाहरण वर्धमान पेठकर यांची आहे आपल्या दुःखाचे परिस्थितीचे भांडवल करण्यापेक्षा आपण आपल्या संघर्षाला ताकद बनवून आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये काम करू शकतो त्याला कुठल्याही गुरूची गरज नाही परिस्थिती हाच खरा गुरु आहे आज मिठाई क्षेत्राची कुठलाही संबंध नसताना सुरुवातीला आचारी लावून वर्धमान पेटकर यांनी फरसाण बनवण्यास सुरुवात केली नंतर मात्र स्वतः फरसाण गुडी शेव जिलेबी लाडू स्वतः करून आठवडा बाजार करून विक्री करत आहे यामुळे वर्धमान यांना चांगला रोजगार भेटला असून मुलगाही हाच व्यवसाय असल्याने उन्नतीचा मार्ग त्यांना सापडला आहे आजच्या युवा पिढीने नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यवसाय करावा उत्तम उदाहरण आहे व्यवसाय परवडत नाही धंद्यात काही खरी नाही आपण धंदा करू शकत नाही या नोंदणी आजची पिढी भरकटलेली आहे त्यामुळे तक्रारीचे पाढे वाचण्यापेक्षा स्वतः काहीतरी करून दाखवा परमेश्वर त्यात नक्की यश देतो सचोटी प्रामाणिकता नम्रता याच्या जोरावर सुखी संपन्न आयुष्य जगता येते त्यासाठी आजच्या पिढीने याचा बोध घ्यावा हीच अपेक्षा
कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…
करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी करण्यात आली…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या धकाधकीच्या युगामध्ये पत्रकारानी आरोग्याची काळजी घेऊन वेळोवेळी तपासणी करून तणाव मुक्त…