करमाळा प्रतिनिधी :- करमाळा तालुक्यातील व्यापार व उद्योगांच्या पोषक वातावरणनिर्मिती साठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन माढा लोकसभेचे खा.रणजितसिंह नाईक निंबाळकरयांनी केले. करमाळा येथे मोदी @9 यां उपक्रमाअंतर्गत भारतीय जनता पार्टी करमाळा व भारतीय जनता व्यापार आघाडी च्या वतीने व्यापारी संमेलन आयोजित करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.यावेळी बोलताना खासदार निंबाळकर पुढे म्हणाले कि, मोदी सरकारने गेल्या नऊ वर्षात व्यापारी बंधूसाठी अनेक योजना केल्या आहेत.यामध्ये मुद्रा लोन, फेरीवाल्या छोट्या – मोठ्या व्यापाऱ्यांसाठी व इतर सर्वच वर्गासाठी अनेक योजना यशस्वीपणे राबवल्या आहेत. करमाळा तालुक्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर जेऊर रेल्वे थांब्याचा प्रश्न आपण लवकरच मार्गी लावणार आहोत, तसेच केळी संशोधन केंद्र निर्मितीसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.या बरोबर करमाळा येथील औद्योगिक वसहतीच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासोबत लवकरच बैठक लावू असे आश्वासन त्यांनी उपस्थित व्यापारी बांधवाना दिले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी केले.
या प्रास्ताविकामध्ये गणेश चिवटे यांनी भारतीय जनता पार्टी व मोदी सरकारने गेल्या नऊ वर्षातील जनतेच्या हितासाठी केलेली कामे सांगितली ,
त्यामध्ये फेरीवाल्यांसाठी दहा हजार रुपयांपासून पन्नास हजार रुपयापर्यंत पी.एम स्वनिधी ही योजना आणली आहे, छोटे- मोठे व्यावसायिक डोळ्यासमोर ठेवून मुद्रा योजनेची प्रभावी अंमलबजावणी सरकारने केली यामध्ये विनातारण व कोणतेही प्रक्रिया शुल्क न आकारता पाच वर्षासाठी तीन प्रकारचे कर्ज दिले जाते यामध्ये शिशु योजनेअंतर्गत पन्नास हजाराचे कर्ज दिले जाते हे कर्ज व्यवस्थित फेडल्यास किशोर प्रकारामध्ये पाच लाख रुपयापर्यंतचे कर्ज मिळते, तसेच आपण बँकेत व्यवस्थित व्यवहार केले तर आपले व्यवहार पाहून दहा लाखापर्यंत विनातारण कर्ज दिले जाते ,यापुढे जाऊन आपणास जर प्रक्रिया उद्योग करायचे असतील तर केंद्र शासनाच्या एम.एस.एम.ई योजनेअंतर्गत 35% सबसिडीची कर्ज अनुदानित मिळते इत्यादी माहिती त्यांनी प्रस्ताविकामध्ये दिली,
यावेळी व्यासपीठावर भारतीय
किराणा असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे,अमोदशेठ संचेती , जेऊरचे प्रसिद्ध व्यापारी संपत राठोड, सचिन साखरे, भाजपा जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, दिपक चव्हाण, माढा तालुका युवा मोर्चा अध्यक्ष उमेश पाटील,व्यापारी आघाडीचे शहराध्यक्ष जितेश कटारिया, तालुकाध्यक्ष लखन ठोंबरे, महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव, रामभाऊ ढाणे, काकासाहेब सरडे, संजय घोरपडे, बाळासाहेब कुंभार, अमोल पवार, नितीन झिंझाडे, माया भागवत, राजश्री खाडे, संगीता नष्टे, चंपावती कांबळे,पांडुरंग भिंगारे, प्रवीण देवी, लक्ष्मण वाघमारे, चेतन किंगर,नारायण पवार ,हरिभाऊ कोकाटे, राजेंद्र जगताप, जयंती दळवी, रमेश भंडारे ,उमेश अग्रवाल ,रुद्रकुमार चोपडे, शिवकुमार चिवटे, समीर श्रीवास्तव, रवींद्र बरिदे, नागनाथ राखुंडे , मुकुंद जव्हेरी, बाळासाहेब बागडे, बाळासाहेब कोकीळ,गिरीष पटेल, अभिजीत वाशिंबेकर, देविदास चिवटे,संजय ओतारी, राजेंद्र किरवे ,
तसेच केम, कंदर, जेऊर ग्रामीण भागातील व्यापारी आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…
करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी करण्यात आली…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या धकाधकीच्या युगामध्ये पत्रकारानी आरोग्याची काळजी घेऊन वेळोवेळी तपासणी करून तणाव मुक्त…