Categories: करमाळा

श्रीदेवीचा पायथा ते खंडोबा मंदीर या रस्त्यावर दोन्ही बाजुला सर्विस रोड करा माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या बांधकाम खात्याला सुचना

 

करमाळा (अभय माने ) देवीचा माळ पायथा ते चढावरील खंडोबा मंदिर यादरम्यानच्या जवळपास 400 मीटर रस्त्याच्या दोन्ही बाजूने सर्विस रस्ता करावा ही सर्व भक्तांची मागणी होती या कंपनीच्या ठेकेदारांनी सुद्धा या रस्त्याच्या दोन्ही बाजूनी सर्विस रोड करून देण्याचा शब्द दिला होता
मात्र काही ठराविक लोकांनी या रस्त्याला विरोध केल्यामुळे भक्तांचे अपघातामुळे जीवनमान धोक्यात आले होते.यावर प्रचंड वाद झाला होता
आमदार संजयमामा शिंदे यांनी सुद्धा या रस्त्यासाठी मार्ग काढण्यासाठी तहसील कार्यालयात बैठक घेतली होती
माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे निवासस्थानी सर्व करमाळा देवी भक्त
देवीचा माळ ग्रामपंचायत सदस्य व नागरिक व कमलादेवी ट्रस्टचे सर्व पदाधिकारी अशा सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांचे उपस्थित बैठक घेण्यात आली
या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते नवरात्र काळात तर दररोज किमान दोन ते तीन लाख लोक कमला देवीच्या दर्शनासाठी येतात शिवाय या रस्त्याच्या चौकातून सात ते आठ साखर कारखान्याची ऊस वाहतूक केली जाते या ठिकाणी तीन चौक तीन रस्ते एकत्र येतात व एकदम न्यूटन घेऊन वळतात यामुळे सातत्याने अपघात होतात या रस्त्याला प्रचंड तीव्र उतार आहे या सर्व बाबींमुळे या क्षेत्राला सार्वजनिक बांधकाम विभागाने अपघात क्षेत्र म्हणून घोषित केले आहे
त्यामुळे भावी काळातील मोठे मोठे अपघात टाळून जीवित हानी टाळण्यासाठी या मूळ रस्त्याच्या दोन्ही बाजूने 15 फुटाचा सर्व्हिस रस्ता होणे गरजेचे आहे जयवंतराव जगताप यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यामुळे हा रस्ता होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे
उपस्थित पदाधिकाऱ्यासमवेत जयवंतराव जगताप यांनी आमदार संजय मामा शिंदे यांना फोन लावून या रस्त्याचे महत्त्व पटवून देऊन यातील अडथळा दूर करण्याच्या विनंती केली
यानंतर बांधकाम खात्याचे अभियंता वामन उबाळे यांना फोन करून या रस्त्याच्या आड येणारी अतिक्रमणे पोलीस बंदोबस्त लावून काढावा
कमला भवानी भक्तांच्या जीविताचे महत्व असून ठराविक लोकांच्या विरोधासाठी हा रस्ता काढून ठेवणे योग्य नसल्याचे मत सुद्धा सर्व उपस्थित लोकांनी व्यक्त केले.
या बैठकीसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे देवीचा माळ सरपंच महेश सोरटे कमला भवानी देवी ट्रस्ट अध्यक्ष सोमनाथ चिवटे सचिव अनिल पाटील देवीचामाळ येथील प्रमुख पुजारी दादासाहेब पुजारी विजय चव्हाण थोरबोले शिंदे चव्हाण फुले उपसरपंच शितल थोरबोले ग्राम पंचायत. सदस्य‌ सचिन शिंदे संतोष पवार सोरटे व. तंटामुक्त मुक्त अध्यक्ष संतोष. चोरमले. कमला भवानी सर्व. सेवेधारी देवीचे माळावरील ग्रामस्थ आणि करमाळा शहरातील. भक्तगण. उपस्थित. होते आदिसह शेकडो भक्तगण उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

1 day ago

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

2 days ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

3 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

3 days ago