चिखलठाण ( बातमीदार)कोरोनामध्ये वडील गमावलेल्या शेटफळ ता करमाळा येथील सोमनाथ माने यांच्या मुलांना जगदिशब्द फाऊंडेशनच्या वतीने तिसऱ्या वर्षीही शैक्षणिक साहित्याची मदत करण्यात आली. दोन वर्षांपूर्वी शेटफळ ता करमाळा येथील खासगी गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करणारे सोमनाथ माने या अठ्ठावीस वर्षीय तरूणाचे दु:खद निधन झाले होते त्याला तीन लहान मुले आहेत ही बातमी जगदिशब्द फाऊंडेशनचे अध्यक्ष मुळ करमाळा तालुक्यातील प्रसिद्ध व्याख्याते व सामाजिक कार्यकर्ते जगदिश ओहोळ यांना पुणे येथे कळल्यानंतर त्यानी या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना धीर दिला व त्यांच्या तीन्ही मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले गेल्या तीन वर्षांपासून आवर्जून या कुटुंबाची भेट घेऊन ते सर्व शालेय साहित्याची मदत करत आहेत आशा प्रकारची मदत सोगाव येथील
कोरोना काळात आई वडील गमावलेल्या बालकांनाही केली असून या मुलांचे शिक्षण थांबू नये, ती बालके शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाऊ नयेत या हेतूने जगदीशब्द फाउंडेशनच्या वतीने हा उपक्रम राबविला जात आहे शेटफळ व
सोगाव येथे साहित्य वितरित करताना व नागरिक उपस्थित होते. तर शेटफळ येथे उद्योजक अशोक शिंदे, शहाजी गोरवे , निलेश पाखरे,गंगासेन वाघमारे,समाधान ओहळ उसामाजिक कार्यकर्ते प्रशांत नाईकनवरे , योगेश सातपुते
नागनाथ माने उपस्थित होते.
प्रतिक्रिया १) रूक्मिणी माने (सोमनाथ माने यांच्या आई शेटफळ )जगदीश भाऊ आमच्या लेकरांसाठी शाळेचं साहित्य घेऊन आठवणीने आले , आमच्या मुलाबाळांच्या एल शिक्षणावर त्यांचं लक्ष आहे, या गोष्टीचा आधार वाटतो.
प्रतिक्रिया २) जगदिश ओहोळ (प्रमुख जगदिशब्द फाऊंडेशन) कोरोनामुळे आईवडील गमावलेली छोटी बालके घरच्या परिस्थितीमुळे शिक्षणाचा मुळ प्रवाहापासून दूर जाऊ नयेत व या कुटुंबाच्या मनात एकटेपणाची भावना निर्माण होऊ नये यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न असुन यामधुन आम्हाला मानसिक समाधानाचा अनुभव मिळतो
करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजाचे अविरत सेवा करणारा प्रमुख घटक…
मुंबई /प्रतिनिधी देशभरातील माध्यमांतील पत्रकार व संपादक यांच्या न्याय हक्कांसाठी संपादक व जेष्ठ माध्यम तज्ञ…
करमाळा, प्रतिनिधी - राज्यभर व्याप्ती असलेल्या युवा भिम सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने दिला जाणारा…
करमाळा प्रतिनिधी Tv 9 मराठीचे करमाळा येथील पत्रकार शितलकुमार मोटे यांना जगदीशब्द फाउंडेशनचा राज्यस्तरीय क्रांतिसूर्य…
करमाळा प्रतिनिधी पुरुषाबरोबर स्त्रिया सर्व क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवत असून स्वतःच्या पायावर उभा राहूनच आपल्या…
सोलापूर प्रतिनिधी समरसतेची वारी... साहित्यिकांच्या घरी* समरससता साहित्य परिषद महाराष्ट्र सोलापूर शाखेच्या वतीने *‘समरसतेची वारी...…