दत्तकला शिक्षण संस्थेमध्ये नवीन अभ्यासक्रम तसेच प्रवेश क्षमता वाढीस मंजुरी- प्रा रामदास झो

 

करमाळा प्रतिनिधी  स्वामी चिंचोली (भिगवण) येथील दत्तकला शिक्षण संस्थेच्या दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिटयुशन्स मधील इंजिनिअरींग विभागात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अॅण्ड डाटा सायन्स (AIDS) हा नवीन पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम २४ प्रवेश क्षमतेसह शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या प्रवेश प्रक्रियेपासून सुरू करण्यास “अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली” यांनी मान्यता दिलेली आहे. तसेच पदवी विभागातील कॉम्प्युटर इंजिनिअरींग शाखेच्या प्रवेश क्षमतेस ६० वरून १२०, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कॉम्प्युटर इंजिनिअरींग शाखेस ३० वरून ६०, मॅनेजमेंट विभागातील एमबीए अभ्यासक्रमास १२० वरून १८०, एसीए अभ्यासक्रमास १२० वरून १८० इतकी प्रवेश क्षमता वाढीस देखील मंजुरी देण्यात आलेली आहे, अशी माहिती दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी दिली.

पुढे प्रा. झोळ म्हणाले की, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अॅण्ड डाटा सायन्स (AIDS) हा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम परिसरातील तसेच ग्रामीण भागातील कोणत्याच संस्थेमध्ये शिकवला जात नाही म्हणुन तसेच जगातील आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या संकल्पनेचे वाढते महत्व लक्षात घेवून ग्रामीण भागातील विद्यार्थी त्यामध्ये मागे पडू नये म्हणून हा अभ्यासक्रम सुरू केला आहे तसेच कॉम्प्युटर क्षेत्राच्या वाढत्या मागणीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सहजतेने ग्रामीण भागातच या क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रमांचे शिक्षण घेता यावे म्हणून कॉम्प्युअर इंजिनिअरींग व इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कॉम्प्युटर इंजिनिअरींग या अभ्यासक्रमांच्या प्रवेश क्षमतेमध्ये वाढ केलेली आहे. आजमितिस दत्तकला हा कॉम्प्युटर इंजिनिअरींग (१२० प्रवेश क्षमता) व संबंधित इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (६० प्रवेश क्षमता), इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कॉम्प्युटर इंजिनिअरींग (६० प्रवेश क्षमता) अभ्यासक्रमांचे शिक्षण देणारा व त्याच बरोबर देखील एबीए व एसीए अभ्यासक्रमांचा सर्वांत जास्त प्रवेश क्षमता असलेला कॅम्पस झालेला आहे.

दत्तकलेचा निसर्गरम्य व हरित कॅम्पस, तेथील गुणवत्तापुर्ण शिक्षण देण्यातील कटिबद्धता तसेच ग्रामीण भागातील विद्याथ्र्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठीची धडपड व जागतिक स्पर्धेत टिकता यावे यासाठी वेळोवेळी राबविण्यात येणारे नाविण्यपुर्ण उपक्रम यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांबरोबरच शहरी भागातील विद्यार्थ्यांचा देखील प्रवेशासाठी दत्तकलेकडे ओढा वाढत चालला आहे असे प्रतिपादन संस्थेचे उपाध्यक्ष श्री. राणा सुर्यवंशी यांनी केले.

तरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कॉम्प्युटर व त्या क्षेत्राशी संबंधित असलेले सर्व प्रकारचे पदवी व पदव्युत्तर पदवी शिक्षण घेण्यासाठी शहरी भागाकडे अधिक आर्थिक भार सोसून न जाता ग्रामीण भागातच याचे शिक्षण घ्यावे असे आवाहन संस्थेच्या सचिव सौ. माया झोळ यांनी केलेले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

देशभरातील पत्रकार, संपादकांच्या न्याय हक्कासाठी राष्ट्रीय पत्रकार महासंघ संपादक व माध्यम तज्ञ राजा माने यांची पत्रकार दिनी मुंबईत घोषणा

मुंबई /प्रतिनिधी देशभरातील माध्यमांतील पत्रकार व संपादक यांच्या न्याय हक्कांसाठी संपादक व जेष्ठ माध्यम तज्ञ…

3 hours ago

अमोल जाधव यांना ‘युवा भिम सेना’चा उत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार

करमाळा, प्रतिनिधी - राज्यभर व्याप्ती असलेल्या युवा भिम सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने दिला जाणारा…

12 hours ago

Tv 9 मराठीचे पत्रकार शितलकुमार मोटे यांना जगदीशशब्द फाउंडेशनचा पुणे येथे राज्यस्तरीय क्रांतिसूर्य पुरस्कार प्रदान

करमाळा प्रतिनिधी Tv 9 मराठीचे करमाळा येथील पत्रकार शितलकुमार मोटे यांना जगदीशब्द फाउंडेशनचा राज्यस्तरीय क्रांतिसूर्य…

13 hours ago

मुलींनी स्वतःच्या पायावर उभा रहावे -तहसीलदार शिल्पाताई ठोकडे

करमाळा प्रतिनिधी पुरुषाबरोबर स्त्रिया सर्व क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवत असून स्वतःच्या पायावर उभा राहूनच आपल्या…

1 day ago

समरसतेची वारी… साहित्यिकांच्या घरी* समरससता साहित्य परिषद महाराष्ट्र सोलापूर शाखेच्या वतीने *‘समरसतेची वारी… साहित्यिकांची घरी’* या उपक्रमाचा शुभारंभ

सोलापूर प्रतिनिधी समरसतेची वारी... साहित्यिकांच्या घरी* समरससता साहित्य परिषद महाराष्ट्र सोलापूर शाखेच्या वतीने *‘समरसतेची वारी...…

2 days ago

दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयामध्ये इंडक्शन प्रोग्राम व फ्रेशर पार्टी उत्साहात साजरी*

भिगवण प्रतिनिधी  : स्वामी चिंचोली, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथील दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसी या…

2 days ago