Categories: करमाळा

आमदार संजयमामा शिंदे यांची सिद्धता आणि विरोधकाची हतबलता – ॲड अजित विघ्ने

* परिस्थितीवर भाष्य करणारे अनेक प्रवक्ते रोजच तालुक्यातील जनतेला वेगवेगळ्या प्रकारच्या वायफळ चर्चा घडविताना दिसत आहेत. वस्तुतः आमदार. संजयमामा शिंदे यांची संयमी वाटचाल करमाळा तालुक्याच्या विकासात मोलाची कामगिरी बजावत आहे.*आजपर्यंत कोणालाही जी जमली नाही ती कठीण कामे त्यांनी मार्गी लावल्याची दिसत आहेत.*

*आजपर्यंत करमाळा तालुक्याचा विकास करण्यासाठी प्रत्येकाला वेळ, संधी मिळाली आहे. कोणी कोणी काय केले हे सांगण्याची गरज सुज्ञ जनतेला नाही. फक्त घोषणाबाजी करणे म्हणजे विकास नाही तर एखादी योजना सरकार दरबारी मांडून कशी अमंलात आणायची याचे कसब आमदार. संजयमामां इतके कोणालाच नाही. अगदी खडतर परिस्थितीत संयमी भुमिका कशी घ्यायची आणि प्रत्येक प्रश्नावर सोल्युशन कसे काढायचे हे आमदार साहेबांकडुन शिकण्या सारखे आहे. राजकारणाचे, समाजकारणाचे, उदयोग व्यवसायाचे, प्लॅन( नियोजन) कसे करायचे हे शिकावे आमदार. संजयमामा कडुनच. जिल्हा परिषदेवर अध्यक्ष पदाची धुरा सांभाळताना.. करमाळा तालुक्यातील अनेक विकासाची कामे त्यांनी मार्गस्थ केली.. एक एक कार्यकर्ता जोडुन प्रत्येक गावागावात असंख्य कार्यकर्त्याचे आज जाळे अल्पावधीत निर्माण करण्याची किमया केली आहे. आज ज्या गावात एक माणुस मिळायला मुश्कील होता, तिथे आज शंभर शंभर कार्यकर्त्यांचा संच ऊभा करण्याची किमया त्यांनी केलेली असुन, आजची परिस्थिती पाहता २०२४ चे आमदार कोण हे सांगण्याची आवश्यकता नाही. परंतु प्रवक्त्याची पोपटपंची यामुळेच तर वाढली आहे असे वाटते. या प्रवक्त्याला आम्ही मोहीते पाटील यांच्या बॅनरखाली निवडणुका लढविणार अशी सतत म्हणण्याची वेळ का यावी? याचे कारण आमदार संजयमामा शिंदे यांची वाढती लोकमान्यता असु शकेल तसेच मोहीते पाटील आता बागलांना समर्थन देतात की काय याची मनातली भिती असावी. मोहीते पाटील आणि बागल यांचे गोटातील बहुसंख्य कार्यकर्त्यांना देखिल आमदार संजयमामा शिंदे जवळचे वाटु लागले आहेत. हे सत्य नाकारता येणार नाही. आमदार. संजयमामा शिंदे यांनी करमाळा तालुक्याच्या विकासाला चालना देताना रस्ते, वीज, पाणी, आरोग्य याला प्राधान्य देताना डिकसळ ते कोंढार चिंचोली सारख्या अनेक योजनांना मंजुरी मिळविली आहे. विजेच्या समस्यांवर मात करताना नवीन एमएसईबी नवीन केंद्रे , नवीन ट्रान्सफॉर्मर, बसविले आहेत.
पाणी पुरवठा नियोजन करताना कुकडी, दहीगाव या योजना प्रभावी पणे कशा चालतील याचे योग्य नियोजन करून करमाळा तालुक्याची इंचन इंच शेती जमीन ओलिता खाली आणण्यासाठीचे शाश्वत नियोजन केले आहे.
सर्वसामान्यांच्या आरोग्याचा प्रश्न सोडविण्यासाठी असाणारी हॉस्पिटल सुसज्ज होत आहेत.
आमदार संजयमामा शिंदे यांना रोखण्यासाठी विरोधकां कडुन शर्तीचे प्रयत्न चालु आहेत, खरं तर कोव्हीड मधे गेलेली दोन वर्षे आणि सरकारची पडझड यामुळे विकासकामे करताना प्रत्येकालाच अडचणी आल्या परंतु त्यातुनही मार्गक्रमण करत आमदार. संजयमामा शिंदे यांनी आपला विकास रथ योग्य रित्या चालविला आहे असेच म्हणावे लागेल. मध्यंतरी आमदार आपल्या दारी… आणि गाव भेट दौरा यानिमित्ताने मामा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले असुन, मुंबईला मंत्रालयात शंभर टक्के उपस्थिती आणि दर शुक्रवारी भरणारा करमाळ्यातील जनता दरबार , सार्वजनिक कार्यक्रमासह प्रत्येकाचे सुख दुःखात असणारा आमदार संजयमामा शिंदे यांचा सहभाग यामुळे जनतेची आणि मामांची नाळ आता पक्की झालेचे चित्र स्पष्ट दिसत आहे. शाश्वत आणि नियोजन बद्ध विकास या सुत्रानुसार करमाळा तालुक्याच्या वैभवात दिवसेंदिवस वाढ झालेली दिसत आहे. राज्याचे राजकारणात विरोधी पक्ष नेते माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे वरील विश्वास सार्थ ठरवत पडझडीच्या काळातही संयमी भुमिका ठेवुन विश्वासाला पात्र राहणेची मामांची भुमिका देखिल सर्व समाजाला आवडलेली असुन, या आणि अशा कित्येक गोष्टीचा फायदा आगामी काळात आमदार संजयमामा यांना होणार हे त्रिकालाबाधीत सत्य आहे. निवडणुका येत राहतील जात राहतील परंतु आमदार संजयमामा यांच्या दुरदृष्टी विचारांचा प्रत्यय कायमच येत राहील. विरोधकांना आमदार संजयमामा यांचे वर टिका टिप्पणी करायला विषयच नाही कारण आपण आदरणीय आमदार संजयमामा शिंदे यांच्या नियोजन बद्ध कामाची पद्धत आणि कोणत्याही विरोधकांचे कामाची पद्धत याची तुलनाच करू शकत नाही, विरोधात असणारी कितीतरी मंडळी आमदार मामासाहेबांच्या वाटेत काटे पेरण्याचे काम करतात परंतु संयमी मामांचे कमी बोलणे आणि अधिक काम करणे हे गुण कुठे आणि विरोधकांची पोकळ पोपटपंची कुठे …. त्यामुळे वैफल्यग्रस्त प्रवक्ते यांचा कसलाच विषय कोणीही विचारात घेणार नाही अशी खरी वस्तुस्थिती आहे. आमदार संजयमामा शिंदे आज माढ्यातील ३६ गावांसह करमाळा तालुक्यातील प्रत्येक गावात जनसामान्याच्या प्रत्येक सुखदुःखाच्या कार्यकमाला हजर आहेत, तसे करमाळयातला कोणता पुढारी नेता माढा तालुक्यातील३६ गावात आणि माढ्यातला पण कोणता नेता करमाळ्यात किती वेळा जनतेसाठी धावुन आला आहे, हे सुद्धा सुज्ञ जनता ओळखुन आहे. करमाळा तालुक्यासह माढ्यातील३६ गावांचा बॅलन्स ठेवणे ही इतकी सोप्पी गोष्ट नाही परंतु आमदार मामांनी हा बॅलन्स ठेवताना प्रत्येकाची काळजी घेतली आहे . सार्वजनिक कामांबरोबरच वैयक्तिक स्वरूपाची कामे करून मामांनी जनसामान्यात *आपला माणूस* ही प्रतिमा निश्चित केलेली आहे. निश्चितच २०१४ पेक्षाही आज करमाळा तालुक्यातील प्रत्येक गावात मामाचा गट आघाडीवर आहे आणि माढ्याच्या ३६ गावातील इनकमिंग तर वाढतच आहे त्यामुळे आगामी काळ आमदार संजयमामा शिंदे यांचेसाठी कसा असेल हे सांगताना 2024 च्या निवडणुकीत आमदार संजयमामा शिंदे यानाच पसंतीचा कौल सर्वाधिक मिळत आहे हे स्पष्ट आहे. वरिष्ठ पातळी पासुन ते भाजपा आणि मुख्यमंत्री शिंदे सेनेतील म्होरकी असणारी सर्व विरोधक मंडळी जेव्हा आमदार. संजयमामांचे विरुद्ध एकत्र येण्याची भाषा करतात त्याचवेळी आमदार मामांचाही आवाका किती मोठा आहे हे सिद्ध होते. निवडणुका येत राहतील आणि जातील परंतु आपल्या करमाळा विधानसभा मतदार संघाला खमके नेतृत्व आवश्यक होते ते लाभलेलं आहे असेच म्हणावे लागेल.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा तालुक्यातील पत्रकारीता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असल्याने त्यांना सन्मानित करण्याचा ‌ सार्थ अभिमान- भरत भाऊ आवताडे

करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…

5 hours ago

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात सोलापूर जिल्हयाचे भाग्यविधाते देशभक्त कै.नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105…

6 hours ago

करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी करण्यात आली…

6 hours ago

सध्याच्या धकाधकीच्या ‌युगामध्ये पत्रकारानी आरोग्याची काळजी घेऊन ‌ वेळोवेळी तपासणी करून तणाव मुक्त आनंदी जीवन ‌ जगावे-डाॅ.गजानन गुंजकर

करमाळा प्रतिनिधी सध्याच्या धकाधकीच्या ‌युगामध्ये पत्रकारानी आरोग्याची काळजी घेऊन ‌ वेळोवेळी तपासणी करून तणाव मुक्त…

1 day ago

लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेने नागरिकाचे हित जपले असून ‌ पत्रकारांसाठी कल्याणकारी योजना ‌राबवुन पत्रकारांना सन्मानित करावे- पत्रकार सुहास घोलप*

करमाळा प्रतिनिधी लोकमंगल सहकारी पतसंस्थेने नागरिकांचे हित जपले असून ‌ पत्रकारांसाठी कल्याणकारी योजना ‌राबवुन पत्रकारांना…

1 day ago

दहिगाव सब स्टेशन येथे नवीन ट्रान्सफॉर्मर बसवावा -संजय सावंत माजी नगरसेवक क,न,प,

करमाळा प्रतिनिधी  करमाळा नगरपरिषदेच्या. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या दहिगाव सबस्टेशन वर नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावा…

2 days ago