Categories: करमाळा

पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकीला देखील प्रवेशाची संधी-प्रा. रामदास झोळ

 

करमाळा प्रतिनिधी  ज्या पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रम पुर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला काही कारणास्तव जर प्रवेश मिळाला नाही तर अशा विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला देखील प्रवेशाची संधी असते अशी माहिती स्वामी चिंचोली ( भिगवण) येथील दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी दिली.
मागील काही वर्षातील अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेच्या स्थितीचा आढावा घेतला असता असे निदर्शनास येते की, पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रम पुर्ण केलेल्या विद्यार्थ्याची संख्या जास्त असते परंतु थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकी प्रवेशासाठी मोजक्याच जागा असल्याने विद्यार्थ्यांची इच्छा असुन देखील पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येत नाही त्यामुळे विद्यार्थी इतर अभ्यासक्रमाचा पर्याय निवडतो किंवा नोकरी करण्याचा पर्याय निवडतो. परंतु थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकीच्या जागा पुर्णपणे भरलेल्या असल्यामुळे जर एखाद्या विद्यार्थ्यांला पदवी अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यावयाचे असेल तर सदर विद्यार्थ्यांला सीईटी प्रवेश परिक्षा न देता देखील पदविका अभ्यासक्रमाच्या मार्कावर (कमीत कमी ४५ टक्के व ४० टक्के मार्क मागासवर्गीय उमेदवारासाठी) प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकीला देखील प्रवेश घेता येतो यासंबंधीची माहिती अनेक पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना नसल्यामुळे बहुतांश विद्यार्थी पदवी अभियांत्रिकी प्रवेशापासून वंचित राहत आहेत. सध्या अशी परिस्थिती कॉम्प्युटर व आयटी या शाखांसाठी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाबाबत निर्माण झालेली आहे, मागील दोन वर्षात म्हणजेच कोरोनाचा काळ संपल्यानंतर कॉम्प्युटर व आयटी या शाखांना प्रवेश घेण्याऱ्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे त्यामुळे प्रथम वर्षाची प्रवेश क्षमता पुर्णपणे भरलेली जात असुन कॉम्प्युटर व आयटीच्या थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकी प्रवेशासाठी अत्यंत कमी जागाच प्रवेशासाठी शिल्लक राहत आहेत असे ते पुढे म्हणाले.
तरी ज्या पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकीला प्रवेश मिळालेला नाही अशा सर्व विद्यार्थ्यांनी प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी प्रवेशासाठीच्या पर्यायाबाबत देखील जरूर विचार करावा व सध्या प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कडून प्रवेशासाठी नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू झालेली असुन दि. ०३/०७/२०२३ रोजी सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत नोंदणी प्रक्रिया सुरू राहणार आहे. तरी अशा सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षेच्या संकेतस्थळावर जावून नोंदणी करून घेण्याचे आवाहन प्रा. रामदास झोळ यांनी केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा तालुक्यातील पत्रकारीता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असल्याने त्यांना सन्मानित करण्याचा ‌ सार्थ अभिमान- भरत भाऊ आवताडे

करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…

13 hours ago

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात सोलापूर जिल्हयाचे भाग्यविधाते देशभक्त कै.नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105…

13 hours ago

करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी करण्यात आली…

14 hours ago

सध्याच्या धकाधकीच्या ‌युगामध्ये पत्रकारानी आरोग्याची काळजी घेऊन ‌ वेळोवेळी तपासणी करून तणाव मुक्त आनंदी जीवन ‌ जगावे-डाॅ.गजानन गुंजकर

करमाळा प्रतिनिधी सध्याच्या धकाधकीच्या ‌युगामध्ये पत्रकारानी आरोग्याची काळजी घेऊन ‌ वेळोवेळी तपासणी करून तणाव मुक्त…

2 days ago

लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेने नागरिकाचे हित जपले असून ‌ पत्रकारांसाठी कल्याणकारी योजना ‌राबवुन पत्रकारांना सन्मानित करावे- पत्रकार सुहास घोलप*

करमाळा प्रतिनिधी लोकमंगल सहकारी पतसंस्थेने नागरिकांचे हित जपले असून ‌ पत्रकारांसाठी कल्याणकारी योजना ‌राबवुन पत्रकारांना…

2 days ago

दहिगाव सब स्टेशन येथे नवीन ट्रान्सफॉर्मर बसवावा -संजय सावंत माजी नगरसेवक क,न,प,

करमाळा प्रतिनिधी  करमाळा नगरपरिषदेच्या. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या दहिगाव सबस्टेशन वर नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावा…

2 days ago