Categories: करमाळा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सरकार हे सर्वधर्मसमभावाचे सरकार- आरोग्यमंत्री दिपक केसरकर

करमाळा प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील हे सरकार सर्वधर्मसमभावाचे ‌ सरकार असून काँग्रेस राष्ट्रवादीने मुस्लिम समाजाचा फक्त वोट बँक म्हणून वापर केला त्यांच्या मागे न जाता शिंदे सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. करमाळा येथील नगरपालिकेच्या शिक्षण मंडळ अंतर्गत असलेल्या नामदेवराव जगताप उर्दु शाळा इयत्ता नववी व दहावीच्या वर्ग सुरू करण्यास राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने करमाळ्यात मंजुरी दिल्याबद्दल सकल मुस्लिम समाजाच्या वतीने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर मुख्यमंत्री सहायता समिती कक्षाची प्रमुख मंगेश चिवटे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की कोणताही धर्म जातीभेद शिकवत नाही अहिंसा शांतता सद्भावना हीच शिकवण सर्वधर्मियाकडून मिळते ज्यावेळेस स्वतःला जातीवर आधारित भारत आणि पाकिस्तान देश वेगवेगळे झाले त्यावेळी पाकिस्तानने मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषित केले.भारताने स्वतःला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित न करता सर्व धर्म समभाव असलेले राष्ट्र म्हणून घोषित केले आहे त्यानुसारच भारतात आजही भारत व महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम गुण्या गोविंदात एकत्रित नांदत आहेत त्यामुळे जातीभेद न मानता धर्मनिरपेक्षितीची शिकवण देणाऱ्या शिंदे सरकार मोदी सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन आरोग्यमंत्री दिपक केसरकर यांनी केले. यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, माजी नगराध्यक्ष शौकत नालबंद, करमाळा मुस्लिम समाजचे अध्यक्ष उस्मानशेठ तांबोळी, मुस्लिम समाज विचारवंत मार्गदर्शक कलीम काझी, माजी उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी, माजी नगरसेवक अल्ताफ तांबोळी, भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम फाउंडेशनचे संस्थापक समीर शेख, हाजी आसिफ, उर्दू शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मजहर नालबंद, मुख्याध्यापक जुबेर जानवढकर, सादिक शेख, सुरज शेख, रमजान बेग, फारुक बेग, फारुक जमादार,जमीर सय्यद, जहांगीर बेग, आझाद शेख, मुस्तकीम पठाण, दिशान कबीर, फिरोज बेग, सादिक काझी, युसुफ बागवान, अकिल शेख, वाजिद शेख, समीर शेख, तौफिक शेख, अमीन बेग, आरीफ खान, इक्बाल शेख, समीर वस्ताद, नागेश उबाळे, गुलाम सय्यद, खलील मुलाणी, इम्रान घोडके आदी उपस्थित होते. सकल करमाळा मुस्लिम समाज, भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम फाउंडेशन करमाळा व नामदेवराव जगताप उर्दू शाळा व्यवस्थापन समिती यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते

saptahikpawanputra

Recent Posts

कोल्हापूरच्या पावणे चार वर्षाच्या साम्राज्य मराठे ची सह्याद्रीतील सर्वात कठीण लिंगाणा सुळक्यावर चढाई.

कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…

8 hours ago

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी आमदार देशभक्त नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…

8 hours ago

करमाळा तालुक्यातील पत्रकारीता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असल्याने त्यांना सन्मानित करण्याचा ‌ सार्थ अभिमान- भरत भाऊ आवताडे

करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…

23 hours ago

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात सोलापूर जिल्हयाचे भाग्यविधाते देशभक्त कै.नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105…

23 hours ago

करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी करण्यात आली…

23 hours ago

सध्याच्या धकाधकीच्या ‌युगामध्ये पत्रकारानी आरोग्याची काळजी घेऊन ‌ वेळोवेळी तपासणी करून तणाव मुक्त आनंदी जीवन ‌ जगावे-डाॅ.गजानन गुंजकर

करमाळा प्रतिनिधी सध्याच्या धकाधकीच्या ‌युगामध्ये पत्रकारानी आरोग्याची काळजी घेऊन ‌ वेळोवेळी तपासणी करून तणाव मुक्त…

2 days ago