Categories: करमाळा

जिल्हा परिषद शाळा घारगाव येथील शाळेने पर्यावरणाचा संदेश देत काढली चिमुकल्याची दिंडी

करमाळा प्रतिनिधी घारगाव ता.करमाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने काढली चिमुकल्याची दिंडी दिंडीतून दिला पर्यावरणाचा संदेश दिला आहे.
जय जय राम कृष्ण हरी! ज्ञानोबा माऊली ,माऊली ,तुकाराम, मुक्ताबाई, जनाबाई ,एकनाथ असा अखंड जयघोष आणि टाळ मृदंगाचा गजर करत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारगाव मधील छोट्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी एकत्रितपणे दिंडी काढली.
यावेळी हातात भगवे झेंडे व पर्यावरणाचा संदेश देणारे फलक झाडे लावा झाडे जगवा, मुली वाचवा देश वाचवा, सुंदर माझे गाव स्वच्छ माझे गाव ,पाणी वाचवा जलसंवर्धन करा असे अनेक संदेश देणारे फलक हातात घेऊन पर्यावरण संवर्धन करण्याचे आवाहन केले.
विद्यार्थ्यांनी नको पांडुरंग मला सोन्याचे चांदीचे दान रे! फक्त भिजव पांडुरंग हे तहानलेले रान रे!! कमरेवरचा हात सोडून आभाळाला लाव तू! ढगाला थोडे हलवून भिजव माझे गाव तू! असे विविध अभंग बोलत पालखी सोहळा साजरा करण्यात आला. तसेच शालेय विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी, मुक्ताई ,तुकाराम, एकनाथ, जनाबाई डोक्यावर तुळशी वृंदावन गळ्यात माळा विविध संतांची वेशभूषा करून गावात दिंडी काढण्यात आली.
हा बालगोपालांचा सोहळा साजरा करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री रामहरी जाधवर सर बुधवंत सर खान सर कुलकर्णी सर चव्हाण सर पाटील मॅडम यादगिरी मॅडम व शिक्षक सहशिक्षका असे अनेक जणांनी परिश्रम घेतले. यावेळी गावातील पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
saptahikpawanputra

Recent Posts

भाजप युवा मोर्चाच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी शुभम बंडगर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…

3 hours ago

कोल्हापूरच्या पावणे चार वर्षाच्या साम्राज्य मराठे ची सह्याद्रीतील सर्वात कठीण लिंगाणा सुळक्यावर चढाई.

कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…

12 hours ago

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी आमदार देशभक्त नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…

13 hours ago

करमाळा तालुक्यातील पत्रकारीता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असल्याने त्यांना सन्मानित करण्याचा ‌ सार्थ अभिमान- भरत भाऊ आवताडे

करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…

1 day ago

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात सोलापूर जिल्हयाचे भाग्यविधाते देशभक्त कै.नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105…

1 day ago

करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी करण्यात आली…

1 day ago