Categories: करमाळा

आगामी काळात पूर्व भागातील एक गुंठा क्षेत्र ओलितापासून वंचित राहणार नाही बागायत क्षेत्र म्हणून ओळखला जाईल- माजी आमदार नारायण पाटील

जेऊर प्रतिनिधीआगामी काळात पुर्व भागातील एक गुंठाभर क्षेत्र सुध्दा ओलीतापासून वंचीत राहणार नाही, संपुर्ण पुर्व भाग बागायत क्षेत्र म्हणून ओळखला जाईल असे प्रतिपादन माजी आमदार नारायण पाटील यांनी केले. आळसुंदे ता. करमाळा येथील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आळसुंदे येथे जलजीवन योजना तसेच ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोगातील कामांचे उद्घाटन व लोकार्पण तालुक्यातील मोहिते-पाटील गटाचे आधारस्तंभ दिलीपदादा तळेकर व माजी आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जि प अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, सभापती अतूल पाटील, माजी सभापती शेखर गाडे, उपसभापती दत्तात्रय सरडे, भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा अर्जून सरक, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य नसरुल्ला खान यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी आमदार पाटील म्हणाले की करमाळा मतदार संघातील विकासकामे ठप्प पडली आहेत. दहिगाव उपसा सारख्या सिंचन योजना पुर्ण क्षमतेने चालत नाहीत. याचा फटका शेतीवर होत आहे. आगामी काळात जनतेने आशीर्वाद दिले तर करमाळा तालुक्यातील पुर्व भागातील एक गुंठा क्षेत्रही ओलीतापासून वंचित राहणार नाही.
वीज, पाणी, दळणवळण समस्या वाढत असून सत्ता नसतानाही आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सतत पाठपुरावा करुन मतदार संघातील प्रश्न घेऊन जात आहे. मतदार संघातील विकासाची कामे मार्गी लावण्यासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. जलजीवन योजनेच्या माध्यमातून गावे पाण्यासाठी स्वावलंबी होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘हर गाव जल, हर घर नल’ हि संकल्पना पुर्ण होताना दिसून येत आहे. आळसुंदे ग्रामपंचायतीच्या सरपंच सोमनाथ देवकाते व त्यांच्या सर्व सहकारी विकासाला प्राधान्य देऊन सतत दक्ष राहून काम करतात याचे फलीत आजच्या दिड कोटींच्या विकासकामातुन दिसून येत असल्याचे सांगून त्यांनी गावकरी व ग्रामपंचायत यांनी असेच चांगली ग्रामसुधारणेची कामे करावीत, आपला या गावास सदैव पाठींबा व सहकार्य असल्याचे अभिवचन यावेळी पाटील यांनी दिले.
यावेळी माजी जि. प सदस्य दिलीपदादा तळेकर यांनी माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाची आज करमाळा मतदार संघास गरज असून सन 2024 च्या आगामी विधानसभा निवडणुकीत आपण नारायण पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नारायण पाटील यांना केम जिल्हा परिषद गटातून सर्वाधिक मताधिक्य देऊ अशी खात्री दिलीपदादा तळेकर यांनी बोलून दाखवली.प्रास्तविक पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी केले. यावेळी सरपंच सोमनाथ देवकाते, आबासाहेब अंबारे, प्रा अर्जून सरक, उपसभापती दत्तात्रय सरडे, जि प अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनीही विचार मांडले. या कार्यक्रमाला पुर्व भागातील सरपंच दादासाहेब भांडवलकर (वरकुटे), सरपंच शीतलकुमार मोटे (पाथुर्डी), उपसरपंच संतोष सोनवर (आवाटी), माजी सरपंच पोपटबप्पा पाटील (नेरले),मोतीराम घाडगे, माजी सरपंच दादासाहेब बंडगर (आवाटी), राजू खान (आवाटी). सतीश रुपनर,माजी उपसरपंच गोकूळ पाटील (सालसे),श्री भोसले सरपंच(केम), चंदुनाना अंबारे, सरपंच सागर पोरे (कुगाव), इन्नुसभाई शेख (कुगाव) नवनाथ अवघडे, महेश पाटील, यशवंत सुळ, शिवाजी गवळी, यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच व ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्य यांनी पुढाकार घेतला. उपस्थितांचे आभार उपसरपंच नागनाथ सरवदे यांनी मानले.

saptahikpawanputra

Recent Posts

पवार जनरल हॉस्पिटलच्या विशेष आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३४० हून अधिक रुग्णांची तपासणी ऑर्थोपेडिक दंत तज्ज्ञ डॉक्टरांसह संपूर्ण टीमच्या सेवाभावाचे कौतुक

करमाळा प्रतिनिधी पवार जनरल हॉस्पिटल यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले विशेष आरोग्य शिबिर नागरिकांच्या उत्स्फूर्त…

5 hours ago

शिष्यवृत्ती परीक्षेत उर्दू शाळेच्या विद्यार्थिनींची चमकदार कामगिरी; मौलाना अबुल कलाम आझाद फाउंडेशनतर्फे सन्मान

करमाळा : प्रतिनिधी — करमाळा शहरातील कै. नामदेवराव जगताप नगरपालिका उर्दू शाळेतील विद्यार्थिनींनी शिष्यवृत्ती परीक्षेत…

9 hours ago

करमाळ्यात रंगणार उद्या बैलगाडा शर्यतींचा थरार … कृषीमंत्री मा.ना.दत्तात्रयमामा भरणे व मा.आ.संजयमामा शिंदे यांच्या हस्ते उद्घघाटन.

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील बैलगाडा शर्यतींच्या शौकीनांसाठी यंदा मोठी पर्वणी आहे. स्व. अजितदादा पवार यांच्या…

11 hours ago

श्री कमलाभवानी मंदिरात २ हजार महिलांचा दुर्गा सप्तशती पाठ भक्तिमय वातावरणात सहस्र श्री दुर्गा सप्तशती पाठ सेवा; विश्वकल्याणासाठी सामूहिक प्रार्थना

करमाळा प्रतिनिधी श्रीदेवीचा माळ येथील श्री जगदंबा कमलादेवी मंदिरात सहस्र श्री दुर्गा सप्तशती पाठ सेवेचे…

2 days ago

नेरलेची एसटी आठ दिवसांत सुरू करा; अन्यथा ठिय्या आंदोलन औदुंबर राजेभोसले यांचा एसटी महामंडळाला इशारा; विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर

करमाळा प्रतिनिधी करमाळा–कुर्डूवाडी–नेरले मार्गावर सुरू असलेली एसटी बससेवा अचानक बंद झाल्याने नेरले परिसरातील नागरिक, विद्यार्थी…

2 days ago