Categories: करमाळा

करमाळा शहरातील उर्दू शाळेला नववी दहावीची मान्यता मिळवून दिल्याबद्दल मान्यवराचा रेहनुमा सोशल चॅरिटेबल ट्रस्ट मुस्लिम समाजाच्यावतीने सत्कार

   करमाळा प्रतिनिधी  करमाळा शहरातील नामदेवराव जगताप उर्दू शाळा नववी व दहावी या दोन वर्गाला मान्यता मिळवण्यासाठी तन-मन-धनाने या कामाचा कायम पाठपुरावा केला व यांच्या कामाला यश प्राप्त झाले असे हाजी आसिफ जाफर शेख,,समिर शेख(ए.पी.जे अब्दुल कलाम फाॅन्डेशन संस्थापक अध्यक्ष)मजहर नालबंद(उर्दू शाळा व्यवस्थापक अध्यक्ष)या मान्यवरांचा सत्कार रेहनुमा चॅरिटेबल सोशल वेल्फेअर संस्था व करमाळा मुस्लिम समाज यांच्या वतीने सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते रेहनुमा चॅरिटेबल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हाजी कलीम काझी सर व डॉक्टर समीर बागवान यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला या कार्यक्रमाची प्रस्तावना आझाद शेख(खजिनदार)यांनी केली यावेळेस हाजी असिफ शेख व समीर शेख यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी करमाळा मुस्लिम समाजाचे मार्गदर्शक विचारवंत कलीम काझी सर यांनी आपले विचार व्यक्त करताना मुस्लिम समाजातील युवकांनी प्रशासनात आपल्या नोकरीचा टक्का वाढवयाचा असेल दहावी, बारावी पर्यंतच शिक्षण होईल असे न करता किंवा मध्येच शिक्षण खंडित न करता उच्च शिक्षणा पर्यंत शिक्षण कसे पुर्ण होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. स्पर्धा परीक्षा बरोबर इतर अनेक क्षेत्रात शिक्षण घेऊन काम करण्याची संधी आहे आपल्या बौद्धिक क्षमता ओळखून त्या त्या क्षेत्रात झोकून देऊन चमकदार कामगिरी करण्याचा प्रयत्न करावा. स्पर्धाचे युग असुन या स्पर्धेच्या युगात सर्व गुण संपन्न असे शिक्षण घेऊन आभ्यासात सातत्याने प्रयत्न करावे व उज्वल यश कसे मिळवावे यांचे मार्गदर्शन केले आहे.शिक्षणाने प्रत्येकाला नोकरीच मिळेल ‌असे नाही, परंतु तुमच्या वैचारिक पातळीने समाजातील चांगल्या व वाईट गोष्टी चा फरक समजण्यास मदत होईल. मुस्लीम समाज हा आर्थिक दृष्ट्य कमकुवत आहे . त्यामुळे समाजातील युवकांनी वाईट गोष्टीकडे दुर्लक्ष करून आपल्या कुटुंबाची आर्थिक उन्नती कशी होईल याचा प्रामुख्याने विचार करावा. उच्च शिक्षणासाठी किंवा स्वयं रोजगार उद्योग स्थापन करावयाचा असेल तर त्या संबंधी येणाऱ्या अडी अडचणी संदर्भात माझ्याशी संपर्क साधावा मी त्या अडचणी दूर करण्यासाठी केंव्हाही संपर्क साधावा कारण मुस्लीम समाजातील युवक हा स्वताच्या पायावर खंबीर उभा राहिला पाहिजे हेच माझे मुख्य ध्येय आहे त्यासाठी माझी सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दाखवली आहे. मुस्लीम समाजातील युवकांनी सोशल मीडिया चा वापर चांगल्या गोष्टी करीता करावा असे आवाहन सुद्धा केले आहे या कार्यक्रमाला सुरज शेख(सचिव),ईमत्याज पठाण(उप अध्यक्ष),जीशान कबीर(सदस्य),जमीर सय्यद (विश्वस्त जामा मस्जिद),जमिल काझी,गुलाम सय्यद,जहांगीर बेग,पिंटू बेग,यासीन सय्यद,अल्ताफ दारूवाले,कलीम शेख,पत्रकार बंधू अशपाक सय्यद,दिनेश मडके,अलीम शेख,सिद्धार्थ वाघमारे उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार सामाजिक कार्यकर्ते मुस्तकीम पठाण यांनी केले   करमाळा शहरातील नामदेवराव जगताप उर्दू शाळा नववी व दहावी या दोन वर्गाला मान्यता मिळवण्यासाठी तन-मन-धनाने या कामाचा कायम पाठपुरावा केला व यांच्या कामाला यश प्राप्त झाले असे हाजी आसिफ जाफर शेख,,समिर शेख(ए.पी.जे अब्दुल कलाम फाॅन्डेशन संस्थापक अध्यक्ष)मजहर नालबंद(उर्दू शाळा व्यवस्थापक अध्यक्ष)या मान्यवरांचा सत्कार रेहनुमा चॅरिटेबल सोशल वेल्फेअर संस्था व करमाळा मुस्लिम समाज यांच्या वतीने सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते रेहनुमा चॅरिटेबल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हाजी कलीम काझी सर व डॉक्टर समीर बागवान यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला या कार्यक्रमाची प्रस्तावना आझाद शेख(खजिनदार)यांनी केली यावेळेस हाजी असिफ शेख व समीर शेख यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी करमाळा मुस्लिम समाजाचे मार्गदर्शक विचारवंत कलीम काझी सर यांनी आपले विचार व्यक्त करताना मुस्लिम समाजातील युवकांनी प्रशासनात आपल्या नोकरीचा टक्का वाढवयाचा असेल दहावी, बारावी पर्यंतच शिक्षण होईल असे न करता किंवा मध्येच शिक्षण खंडित न करता उच्च शिक्षणा पर्यंत शिक्षण कसे पुर्ण होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. स्पर्धा परीक्षा बरोबर इतर अनेक क्षेत्रात शिक्षण घेऊन काम करण्याची संधी आहे आपल्या बौद्धिक क्षमता ओळखून त्या त्या क्षेत्रात झोकून देऊन चमकदार कामगिरी करण्याचा प्रयत्न करावा. स्पर्धाचे युग असुन या स्पर्धेच्या युगात सर्व गुण संपन्न असे शिक्षण घेऊन आभ्यासात सातत्याने प्रयत्न करावे व उज्वल यश कसे मिळवावे यांचे मार्गदर्शन केले आहे.शिक्षणाने प्रत्येकाला नोकरीच मिळेल ‌असे नाही, परंतु तुमच्या वैचारिक पातळीने समाजातील चांगल्या व वाईट गोष्टी चा फरक समजण्यास मदत होईल. मुस्लीम समाज हा आर्थिक दृष्ट्य कमकुवत आहे . या कार्यक्रमाला सुरज शेख(सचिव),ईमत्याज पठाण(उप अध्यक्ष),जीशान कबीर(सदस्य),जमीर सय्यद (विश्वस्त जामा मस्जिद),जमिल काझी,गुलाम सय्यद,जहांगीर बेग,पिंटू बेग,यासीन सय्यद,अल्ताफ दारूवाले,कलीम शेख,पत्रकार बंधू अशपाक सय्यद,दिनेश मडके,अलीम शेख,सिद्धार्थ वाघमारे उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार सामाजिक कार्यकर्ते मुस्तकीम पठाण यांनी केले.

saptahikpawanputra

Recent Posts

भाजप युवा मोर्चाच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी शुभम बंडगर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…

20 hours ago

कोल्हापूरच्या पावणे चार वर्षाच्या साम्राज्य मराठे ची सह्याद्रीतील सर्वात कठीण लिंगाणा सुळक्यावर चढाई.

कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…

1 day ago

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी आमदार देशभक्त नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…

1 day ago

करमाळा तालुक्यातील पत्रकारीता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असल्याने त्यांना सन्मानित करण्याचा ‌ सार्थ अभिमान- भरत भाऊ आवताडे

करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…

2 days ago

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात सोलापूर जिल्हयाचे भाग्यविधाते देशभक्त कै.नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105…

2 days ago

करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी करण्यात आली…

2 days ago