सांगोला/प्रतिनिधी ः
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष व निर्भीड, कर्तव्यदक्ष पत्रकार सतीशभाऊ सावंत यांना टेंभू, ता. कराड येथील इंद्रधनु विचार मंच फाउंडेशनचा सुधारककार गोपाळ गणेश आगरकर राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला असून 14 जुलै 2023 रोजी सकाळी 9ः30 वाजता टेंभू, ता. कराड या ठिकाणी या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
सतीशभाऊ सावंत हे दोन दैनिके यशस्वीपणे चालवीत आहेत. सलग 25 वर्षे पत्रकारितेचा अनुभव असलेले निर्भीड व धाडसी पत्रकार म्हणून त्यांची महाराष्ट्रात ओळख आहे. अनेक नवोदित पत्रकार त्यांनी घडवून त्यांच्या लेखणीला वाव दिला आहे. अतिशय निर्भीडपणे लिखाण करून त्यांनी गोरगरीब दिन, वंचित, उपेक्षितांना न्याय देऊन विकासाला चालना देण्याचा प्रयत्न सातत्याने सतीशभाऊ सावंत यांनी केला आहे. जनतेच्या प्रश्नावर सातत्याने त्यांनी परखडपणे आवाज उठविला आहे. इंद्रधनु विचार मंच फाउंडेशन कराडच्या वतीने सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील टेंभू गावचे सुपुत्र थोर पत्रकार सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांच्या 167 व्या जयंतीनिमित्त दिनानिमित्त राज्यातील प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियातील उत्तुंग कामगिरी करणार्या पत्रकार शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात काम करणार्या पाच मान्यवरांना गोपाळ गणेश आगरकर सुधारक राज्यस्तरीय पुरस्कार 2023 देऊन सन्मानित केले जाते. टेंभू ता.कराड येथे शुक्रवार दिनांक 14 जुलै 2023 रोजी सकाळी 9ः30 वाजता राज्यातील प्रमुख मान्यवरांचे हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. या राज्यस्तरीय थोर पत्रकार गोपाळ गणेश आगरकर सुधारक पुरस्कार सतीशभाऊ सावंत यांना जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…
करमाळा प्रतिनिधी छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग…