Categories: करमाळा

राजस्थान शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील डिजीटल मिडियाला शासकीय जाहिरात द्या राजा माने यांची मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे मागणी

मुंबई,दि:- राज्यातील डिजिटल मिडियाला शासकीय जाहिराती देण्या संदर्भातील नियम,निकष व अटी निश्चित करुन राजस्थान सरकारने तसा अध्यादेश (जी.आर) दि.२६ जून २०२३ रोजी जारी केला.त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील सर्व डिजिटल मिडिया प्लॅटफॉर्म्ससाठी धोरण ठरवून शासकीय जाहिराती देण्याची मागणी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदें, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार व माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालकांकडे आज केली.
केंद्र सरकारच्या डिजिटल मिडियासह राज्यातील रेडिओ व इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या आस्थापनांना श्रमिक पत्रकार कक्षेत घेण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिल्याबद्दल राज्यातील डिजिटल मिडियाच्यावतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्रिमंडळाचे राजा माने यांनी आभार मानले.राजस्थान सरकारने त्या राज्यातील डिजिटल मिडियाला शासकीय जाहिराती देण्यासाठी धोरण ठरवून दि.२६जून २०२३ रोजी तसा अध्यादेश (जी.आर.) जारी केला.फेसबुक, यूट्यूब आदी डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मच्या फॉलोवर्स व सबस्क्राईबर्सची दहा लाखांपासन दहा हजार पर्यंतची अ,ब,क,ड.अशी वर्गवारी करुन अनेक नियम,निकष व अटी निश्चित करुन शासकीय जाहिराती देण्याचा निर्णय घेतला आहे.महाराष्ट्रातील महानगरांतील घराघरात आणि ग्रामीण महाराष्ट्रात वाड्या-वस्त्यांपर्यंत पोहोचलेल्या डिजिटल मिडियाच्या विकासासाठी व शिस्त लावण्यासाठी महाराष्ट्र शासनाने राजस्थान शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील डिजिटल मिडियाला शासकीय जाहिराती तातडीने सुरु कराव्यात अशी मागणी राजा माने आपल्या निवेदनात केली आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

1 day ago

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

2 days ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

3 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

3 days ago