दहीगाव उपसा सिंचन योजनेच्या पोटचाऱ्याचे काम पुर्ण करण्यासाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरत आवताडे यांची गृह राज्यमंत्री मा. शंभुराजे देसाई यांच्याकडे मागणी

करमाळा प्रतिनिधी. दहीगाव उपसा सिंचन योजना शिवसेनेच्या काळात सुरू झाली आहे. करमाळा तालुक्यातील पुर्व भागातील शेतकरी वंचित असुन दहीगाव उपसा सिंचन योजनेतील सिंचन पोटचाऱ्या मंजूर झालेल्या पोटचाऱ्याचे काम पुर्ण होणे गरजेचे आहे तरी हे काम पूर्ण करण्याबाबतची मागणी महाराष्ट्र राज्याचे पणन व गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांच्याकडे शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरत आवताडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.                     दहीगाव उपसा सिंचन योजनेमुळे करमाळा तालुका सुजलाम सुफलाम झाला आहे.करमाळा तालुक्यातील येथील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे. दहीगाव उपसा सिंचन योजनेतील पुर्व भागातील शेतकरी यापासून वंचित असुन येथील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी व त्यांचे जीवन सुखी समृद्ध संपन्न करण्यासाठी पांडे,फिसरे,हिसरे ,सालसे,शेलगाव व इतर गावांतील दहीगाव उपसा सिंचन योजनेतील पोटचाऱ्याचे काम पुर्ण होणे सध्या काळाची गरज आहे. तरी आपण हे काम करण्यासाठी आदेश देऊन काम पूर्ण करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरत आवताडे, संदीप नेटके, सुनील नेटके, रामचंद्र पवार, औंदुबर रोकडे, घनश्याम पाटील, धनंजय नेटके, सुनिल काटे, हिरामण कदम,उमेश आवताडे, सोमनाथ पवळ, योगेश चाळक, शहाजी चाळक, धनंजय शिंदे, हनुमंत सरडे, भाऊसाहेब वीर, अशोक माने, महादेव चोपडे, अशोक माने, संतोष नेटके या पुर्व भागातील शेतकरी बांधवांच्या सह्या असुन दहीगाव उपसा सिंचन योजनेतील पुर्व भागातील पोट चाऱ्याची काम पुर्ण करण्याची मागणी केली आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

1 day ago

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

2 days ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

3 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

3 days ago