Categories: करमाळा

शरद पवार राष्ट्रवादीला मिळणार ‘जनशक्ती’ संघटनेचे बळ…? अतुल खूपसे पाटील राष्ट्रवादीसोबत जाण्याच्या तयारीत मोठी जबाबदारी मिळण्याची दाट शक्यता

करमाळा प्रतिनिधी

ज्या शरद पवारांनी उभी हयात कार्यकर्ते घडविण्यात, त्यांना आमदार खासदार आणि मंत्री करण्यात घालवली. त्याच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असणाऱ्या शरद पवारांना उतरत्या वयात केंद्रीय यंत्रणेच्या भीतीपोटी आणि सत्तेच्या लालसेमुळे
एकटे सोडून अनेक आमदारांनी अजित पवारांच्या हाताला हात धरत शरद पवारांच्या थकलेल्या हाताला दूर केले. मात्र याच शरद पवारांसाठी जनशक्ती संघटना धावून आली असून राष्ट्रवादीला जनशक्ती संघटनेचे बळ मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून रंगत आहे. संघटनेचे प्रमुख अतुल खूपसे-पाटील राष्ट्रवादी सोबत जाण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. आणि जर जनशक्ती संघटना राष्ट्रवादीसोबत गेली तर राष्ट्रवादीची मोठी जबाबदारी अतुल खूपसे पाटील यांच्या खांद्यावर येण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे.

राज्याच्या राजकीय इतिहासामध्ये खूप मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. गेल्या वर्षी शिवसेना फुटली आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर 40 आमदार गेले, एवढेच नव्हे तर त्या आमदारांनी शिवसेनेवर हक्क आणि दावा सांगितला. नेमकी अशीच घडामोड यंदा देखील घडली. राष्ट्रवादीचे सुमारे ३५ ते ४० आमदार फुटून त्यांनी अजित पवार यांच्यासोबत वेगळी चूल मांडली आणि सत्तेत देखील सहभागी झाले. आता याच अजित पवार गटाने राष्ट्रवादीवर देखील दावा सांगितला आहे. त्यामुळे सध्या शरद पवार गट अर्थात मूळ राष्ट्रवादी एकाकी पडल्याचे चित्र महाराष्ट्रभर दिसून येत आहेत. त्यामुळे या एकाकी पडलेल्या राष्ट्रवादीला महाराष्ट्र राज्यातील पावरफुल चळवळीची संघटना असणारी जनशक्तीची साथ लाभणार आहे.

जनशक्ती संघटनेचे प्रमुख अतुल खूपसे पाटील यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे यांची भेट घेतली असून उद्या ते वाय बी सेंटर येथे राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.
अतुल खूपसे पाटील हे प्रहार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख होते. या कालावधीत त्यांनी महाराष्ट्रभर प्रहार संघटनेचे जाळे वाढविले. महाराष्ट्र पिंजून काढत बच्चू कडू यांचा विचार गावोगावी पोहोचविला. मात्र अंतर्गत वादामुळे आणि चुकीच्या गैरसमजामुळे बच्चू कडू आणि अतुल खूपसे पाटील यांच्यात ठिणगी पडली. त्यानंतर त्यांनी स्वतःची जनशक्ती संघटनेची स्थापना केली. वय वर्ष दोन असलेल्या या संघटनेने आज पर्यंत अनेक लक्षवेधी आंदोलने केली आहेत.
– प्रभावी वक्तृत्व, संघटनात्मक कौशल्य अशी छाप असणाऱ्या अतुल खूपसे पाटील यांनी राष्ट्रवादीची साथ दिल्यास राष्ट्रवादीला एक तगडा आणि प्रभावी चेहरा मिळणार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे उद्या शरद पवार यांच्या भेटीत काय निर्णय होतो ते पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

समरसतेची वारी… साहित्यिकांच्या घरी* समरससता साहित्य परिषद महाराष्ट्र सोलापूर शाखेच्या वतीने *‘समरसतेची वारी… साहित्यिकांची घरी’* या उपक्रमाचा शुभारंभ

सोलापूर प्रतिनिधी समरसतेची वारी... साहित्यिकांच्या घरी* समरससता साहित्य परिषद महाराष्ट्र सोलापूर शाखेच्या वतीने *‘समरसतेची वारी...…

9 hours ago

दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयामध्ये इंडक्शन प्रोग्राम व फ्रेशर पार्टी उत्साहात साजरी*

भिगवण प्रतिनिधी  : स्वामी चिंचोली, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथील दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसी या…

9 hours ago

करमाळा विधानसभेत गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली सदस्य नोंदणी जिल्ह्यात एक नंबर होईल – चेतनसिंह केदार

करमाळा प्रतिनिधी - भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा विधानसभा सदस्य नोंदणी मध्ये…

9 hours ago

डॉ आंबेडकरवादी चळवळ व सामाजिक संघटना या संस्थेच्यावतीने शौर्यदिनानिमित्त कोरेगाव भीमा येथे येणाऱ्या भिम अनुयायांना मोफत अन्नदान

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील डॉ आंबेडकरवादी चळवळ व सामाजिक संघटना या संस्थेच्या वतीने शौर्यदिनानिमित्त कोरेगाव…

1 day ago

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

करमाळा प्रतिनिधी. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने डॉ…

1 day ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त रविवारी न समजलेले आई-बाप या विषयावर व्याख्यान

करमाळा प्रतिनिधी.प्रा निकत सरांचे ज्ञानसेवा सोशल फाऊंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट च्या वर्धापन दिनानिमित्त मा…

1 day ago