करमाळा प्रतिनिधी – ( 18 )- करमाळा तालुक्यातील कोंढेज येथील एव्हरेस्ट वीर शिवाजी ननवरे यांचा यथोचित सन्मान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाने करावा अशी मागणी विद्यापीठ स्मारक समितीचे सदस्य तथा करमाळा बाजार समिती चे सभापती प्रा शिवाजीराव बंडगर यानी आज विद्यापीठाकडे समक्ष भेटून केली.
या बाबत बंडगर म्हणाले की , शिवाजी ननवरे हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या भारत महाविद्यालय,जेऊर या महाविद्यालयाचे माजी विध्यार्थी आहेत . शिवाजी ननवरे यांची एव्हरेस्ट सर करण्याची कामगिरी ही विद्यापीठाला अभिमानास्पद, भूषणावह आहे . एखादा माजी विद्ध्यार्थी एखादी सर्वौच्च कामगिरी करतो तेव्हा त्या संस्थेच नाव करत असतो. त्यामुळे विद्यापीठाने सन्मान केल्यास ननवरे यांचा खरा गौरव होईल.विद्यापीठ कुलगुरु राजन कामत यांनी हा विषय चांगला असून ननवरे यांच्या कामगिरीचे कौतुक केले व विद्यापीठाच्या द्रष्टी ने आनंदाची बाब असल्याचे स्पष्ट केले.विद्यापीठाच्या वतीने प्र कुलगुरू डाॅ गौतम कांबळे यानी निवेदन स्वीकारले.या प्रसंगी ढोकरी येथील कार्यकर्ते काका पाटील उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…