करमाळा तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या तीन जिल्हा प्रमुख मार्गाना राज्य मार्गाचा दर्जा द्या सतिश नीळ यांनी केली निवेदनाद्वारे मागणी

 

करमाळा प्रतिनिधी 
करमाळा तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कुंभेज फाटा-पारेवाडी-जिंती चौक ते डीकसळ ते भिगवण तसेचकुगाव-शेटफळ-जेऊर-साडे.
व कोळगाव-निमगाव(ह)वरकुटे-घोटी-ते जेऊर हे तीन जिल्हा प्रमुख मार्गांना राज्य मार्गाचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी श्री. मकाई सहकारी साखर कारखाना संचालक सतीश नीळ यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,पुणे,सोलापूर,धाराशिव जिल्ह्याना जोडणारे हे प्रमुख मार्ग आहेत.त्यामुळे या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते.हे मार्ग सीना कोळगाव व उजनी लाभक्षेत्रालगत असल्यामुळे परिसरात ऊस,केळी,पप़ई सह ईतर अन्य फळ पिकांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.त्यामुळे हा परिसर फ्रूट व शूगर बेल्ट म्हणून ओळखला जातो तसेच या परिसरात आठ ते दहा साखर कारखान्यांची ऊस वाहतूक याच मार्गावरून होते. या परिसरातील समृद्धीसाठी कृषि क्षेत्राला व्यवसायिकदृष्ट्या सबळ करण्यासाठी व विस्तिर्ण उजनी जलाशयातील पक्षी निरीक्षण, कृषी पर्यटन,मत्सअभ्यास केंद्र,वनस्पती अभ्यास केंद्र,नौकाविहार,जलपर्यटनाला चालना देण्यासाठी या मार्गाला राज्य मार्गांना दर्जा देऊन विकसित करणे गरजेचे आहे.आपण या मागणीचा विचार करुन राज्य मार्गाचा दर्जा देण्यात यावा. सदर निवेदनाच्या प्रति सार्वजनिक बांधकाम विभाग करमाळा,कार्यकारी अभियंता अकलूज, अधिक्षक अभियंता सोलापूर यांना देण्यात आल्या आहेत. चौकट.
करमाळा तालुक्यातील रस्ते,पाणी,वीज,सिंचन,आरोग्य
रखडलेली औद्योगिक वसाहत, मांगी तलाव,जातेगाव टेंभुर्णी रस्ता,पुनर्वसनाचे रखडलेल प्रश्न,नविन शर्त व देवस्थान जमिनीचे प्रश्न,रेल्वे संदर्भातील प्रश्न,गायरान जमिन अतिक्रमण, केळी संशोधन केंद्र,लघू पशू चिकीत्सालय,बस स्थानक अशा विविध समस्यांबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांच्या कडे बागल गटाचे नेते,प्रमुख पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली पुढील महिन्यात करमाळा तालुक्यातील शिष्टमंडळ जाणार असल्याची माहिती नीळ यांनी दिली.

saptahikpawanputra

Recent Posts

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

1 day ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

2 days ago

पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचा सहकुटुंब सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील‌ उद्योजक क्लासिक कंपनीचे ‌ मालक ‌ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…

2 days ago

निमगाव (ह )येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर अल्पदरात चष्म्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…

2 days ago

करमाळा एमआयडीसी मधील भूखंड वाटपास सुरुवात उद्योजकांनी लाभ घ्यावा जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग…

5 days ago