करमाळा प्रतिनिधी
राष्ट्रवादीसोबत काम करण्याच्या इराद्याने जनशक्ती संघटनेचे संस्थापक अतुल खूपसे पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष विनिता बर्फे यांच्यासह संघटनेच्या शिष्टमंडळाने गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार व त्यानंतर खा. सुप्रियाताई सुळे यांची भेट घेतली होती. यावेळी सविस्तर चर्चा झाल्यानंतर आज मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात जनशक्ती संघटनेचे अतुल खूपसे पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली. या भेटीनंतर राष्ट्रवादी प्रदेश कार्यालय ते विधान भवन मुंबई असा दोघांचा जयंत पाटील यांच्या गाडीतून चर्चा करत प्रवास झाला.
यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ‘जनशक्ती संघटनेचे काम खूप चांगले आहेत. तुम्हाला महाराष्ट्रभर काम करायला जमेल का, पक्षासाठी फिरायला वेळ आहे का…?’ अशी विचारणा केली.
पुढे बोलताना अतुल खूपसे पाटील म्हणाले की, खा. शरद पवार व खा.सुप्रिया सुळे यांच्या भेटीनंतर झालेल्या आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत झालेल्या चर्चेत राष्ट्रवादीसोबत काम करण्याबद्दल सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेमध्ये बोलताना पुढे म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या कोणता नेता कोणासोबत आहे. यासह जिल्ह्यातील सर्व विधानसभा क्षेत्राची त्यांनी माहिती घेतली. शिवाय याचबरोबर ते म्हणाले की जनशक्ती संघटनेने महाराष्ट्रभर अत्यंत चांगले काम केले आहे. विविध चैनल आणि दैनिकाच्या माध्यमातून आम्ही वाचत असतो. त्यामुळे संघटना आमच्या सोबत आली तर खूप चांगले होईल असे सांगून राष्ट्रवादी पक्षासाठी महाराष्ट्रभर फिरायला जमेल का असे त्यांनी विचारले. शिवाय सध्याचे सुरू असलेले पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर सविस्तर चर्चा करून लवकरच जबाबदारी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.यावेळी दत्ता कापुरे, गणेश वायभासे, रोहन नाईकनवरे, विनीता बर्फे, गीता चापके, शबाना खान, नीता देशपांडे, माधवी सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…