Categories: करमाळा

करमाळा तालुक्यातील आरोग्य सेवा मजबूत होणार… 2 प्राथमिक आरोग्य केंद्रांसह 5 उपकेंद्रांच्या पद निर्मितीला मान्यता -आमदार संजयमामा शिंदे

करमाळा प्रतिनिधी
ग्रामीण भागातील आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी करमाळा – माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये जिंती व म्हैसगाव या 2 ठिकाणी नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बांधकाम पूर्ण झालेले होते ,तसेच वडशिवणे, उमरड, सावडी, पोफळज व गुळसडी या ठिकाणी उपकेंद्रांचे काम पूर्णत्वास गेलेले होते.सदर गावांच्या ठिकाणी आरोग्य सेवा देण्यासाठी शासनाकडून पदभरती करण्यात आलेली नव्हती. महाराष्ट्र शासनाने या उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी पद निर्मितीला आज मान्यता दिलेली असून लवकरच बाह्ययंत्रणेद्वारे पद भरती होऊन ही आरोग्य केंद्रे सुरू होतील, त्यामुळे करमाळा मतदारसंघाची आरोग्य सेवा आता मजबूत होईल असा विश्वास आमदार संजयमामा शिंदे यांनी व्यक्त केला.
याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, सोलापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असल्यापासून आपण करमाळा मतदार संघातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणावर ती निधी दिलेला होता .सदर निधीमधून प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र यांच्या इमारतींचे बांधकाम पूर्णत्वास गेले, परंतु प्रत्यक्षात पदभरती झालेली नसल्यामुळे या इमारती पडून होत्या . मतदार संघातील 2 प्राथमिक आरोग्य केंद्र व 5 उपकेंद्रांमध्ये पदभरती व्हावी यासंदर्भात पाठपुरावा केला. त्याला यश आले असून आरोग्य उपकेंद्रांमध्ये आरोग्य कार्यकर्ता, सहाय्यक परिचारिका व अंशकालीन स्त्री परिचर अशी 3 पदे भरली जाणार असून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी गट अ, वैद्यकीय अधिकारी गट ब ,आरोग्य सहाय्यक( पुरुष) गट क ,आरोग्य सहाय्यक (स्त्री )गट क, सहाय्यक परिचारिका अशी 5 पदे भरली जाणार आहेत.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago