करमाळा प्रतिनिधी
करमाळा येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीची मान्यता प्राप्त झाली असून करमाळा तालुका व परिसरातील गोर-गरीब रुग्णांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे करमाळा तालुका सहकक्षप्रमुख शिवकुमार चिवटे यांनी केले आहे. त्यानुसार शिंदे हॉस्पिटल हे हाडांचे स्पेशालिस्ट आहेत.अपघात झालेल्या रुग्णास तातडीने दाखल केल्यास प्राथमिक उपचारानंतर हाड फ्रॅक्चर झाल्यास शस्त्रक्रिया करायची असेल तर त्याचा खर्च जास्त असतो ते गरीबाला परवडणारे नसते. त्यासाठी आवश्यक ते कागदपत्रे गोळा करून मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळवता येईल.तत्पुर्वी एफ आय आर दाखल करणे गरजेचे आहे.तसेच ज्या रुग्णांना खुब्याचा त्रास आहे व हीप रिप्लेसमेंट ही शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे त्यांनी योग्य ते कागदपत्रे व रिपोर्ट मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या मेल आयडी वरती पाठवून संबंधित आजारा वरती पन्नास हजार ते एक लाख रुपयांपर्यंत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी हाॅस्पिटल च्या खात्यावर मिळवता येऊ शकेल.यासाठी शिंदे हाॅस्पिटल मधील सौरव झिंजाडे (मो.७३५०८७८४०३) व योगेश दिवटे (मो.९११९५३७०८०) यांच्याशी मदतीसाठी संपर्क करावा.या कामी काही अडचण आल्यास शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे, करमाळा तालुका शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख दिपक पाटणे,सहकक्षप्रमुख शिवकुमार चिवटे व मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यक लक्ष्मण सुरवसे सर (मो.८६५७१११५१५)यांच्याशी संपर्क साधावा.
पुढे बोलताना चिवटे म्हणाले हे सर्व हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या शिकवण नुसार ८०% समाजकारण व २०% राजकारण यानुसार संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे काम चालू आहे.आत्ता पर्यंत एक वर्षांत महाराष्ट्रातील अकरा हजार गरजू रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मार्फत ८६ कोटी रुपये मदत करण्यात आली आहे.महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, आरोग्यमंत्री डॉ.तानाजीराव सावंत, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे व मुख्यमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी रुग्णसेवक मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली गोर-गरीब व गरजू रुग्णांना रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची वाटचाल सुरु आहे.
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…