Categories: करमाळा

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग व्यवसायाचा लाभ घ्यावा -जिल्हा संसाधन व्यक्ती मनोज बोबडे

जिंती प्रतिनिधी 20 जुलै 2023 रोजी मौजे जिंती या ठिकाणी कृषी विभाग व महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधान मंत्री फसल बीमा योजना 2024, *प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना* व विविध योजनांचे माहितीचा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी मंडळ कृषी अधिकारी श्री देवीदास चौधरी, मंडळ अधिकारी श्री संतोष गोसावी, कृषी पर्यवेक्षक श्री उमाकांत जाधव श्री.महेश काळे सरपंच प्रतिनिधी श्री ओंभासे कृषी सहाय्यक, श्री विनोद सोनवणे श्री.हरि दळवी श्री.अशीफ तांबोळी,श्रीमती सारिका करपे श्री. फारूक बागवान प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेचे जिल्हा संसाधन व्यक्ती श्री मनोज बोबडे व मंगेश भांडवलकर,दिलीप दंगाणे व जिंति गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते.
यावेळी श्री देवीदास चौधरी मंडळ कृषी अधिकारी यांनी एक रुपयात प्रधान मंत्री फसल बीमा योजना मधे विमा कसा भरावा या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले व प्रातीनिधिक एक अर्ज प्रतक्ष्य भरुन दाखवला.तसेच विमा कसा मिळते याची माहिती सांगितली.खरीप हंगामामध्ये कडधान्य पिकामध्ये तूर मूग उडीद गळीत धान्य मधे सूर्यफूल, तृणधान्ये मधे बाजरी मका भाजीपाला पिकांत कांदा या पिकांचा समावेश असतो असे सांगितले.
यानंतर कृषी पर्यवेक्षक श्री उमाकांत जाधव यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना आणि आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्ताने पौष्टीक तृणधान्ये लागवड तंत्रज्ञान व त्यांचे आहारातील महत्त्व उपस्थित शेतकरी बांधवांना सागितले.
श्री मनोज बोबडे जिल्हा संसाधन व्यक्ती, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना या मध्ये ज्वारी,बाजरी, मका,गहू ,नाचणी वरई प्रक्रिया ,मसाले प्रक्रिया, दूध प्रक्रिया ,डाळ मिल, बेसन व्यवसाय, पापड उद्योग, शेवया उद्योग तेलघाना पशुखाद्य,आंबा व सर्व फळे प्रक्रिया गुळ व्यवसाय महाराष्ट्र शासन कृषी विभागाची ३५ टक्केअनुदानाचा लाभ घ्यावा .यांनी विविध प्रकारच्या प्रक्रिया उद्योग या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. यामधे त्यांनी करमाळा तालुक्यातील आत्तापर्यंत झालेले प्रकिया उद्योगाची माहिती दिली व या योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले.
श्री संतोष गोसावी मंडळ अधिकारी यांनी महसूल विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली..शेवटी आभार प्रदर्शन श्री हरी दळवी यांनी केले .

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

21 hours ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

2 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

2 days ago