करमाळा प्रतिनिधी स्वामी समर्थ देवस्थान समितीमार्फत स्वामी भक्तांसाठी व सर्वसामान्यांसाठी वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमांसह समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. शनिवार दि. 22 जुलै रोजी मोफत होमिओपॅथी शिबीर अक्कलकोट येथे संपन्न होत असून करमाळा तालुक्यातील मतीमंद गतीमंद मुलांसह पालकांनी शिबिरास उपस्थित रहावे व मोफत शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन विश्वस्त भारतराव शिंदे पाटील यांनी केले आहे. सदर होमिओपॅथी शिबीर हे नि:शुल्क असून मुंबई येथील डॉ. प्रफुल्ल विजयकर यांचे सहकारी डॉ.अपर्णा सामळ, डॉ. अंबरीश विजयकर, डॉ. तन्मय विजयकर यांचेसह डॉक्टरांचे विशेष पथक उपस्थित असणार आहे. देवस्थानच्या गाणगापूर रोडवरील श्री स्वामी समर्थ रुग्णालयात 20 वर्षाखालील मतिमंद गतिमंद मुलांसाठी होप फॉर होपलेस होमिओपॅथि शिबिर शनिवारी सकाळी 10 ते सायं.4 वाजेपर्यंत सुरू राहील. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या मोफत आरोग्य शिबीराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी केले आहे.
डॉ. बिपीन परदेशी – करमाळा, होमिओपॅथी ही विविध आजारांवर अत्यंत प्रभावी व गुणकारी ठरत असून विश्वसनीयतेमुळे आव्हानात्मक आजारांसाठी होमिओपॅथी उपचार करून घेण्याकडे रूग्णांचा कल वाढत आहे.
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…
* करमाळा प्रतिनिधी “भारतीय डाक विभागाच्या विविध बचत, विमा आणि आर्थिक सुरक्षा योजना ग्रामीण भागातील…
करमाळा प्रतिनिधी वीट (ता. करमाळा) येथील शेतातील पत्र्याच्या शेडमधून चोरीस गेलेला सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर आणि…