याप्रसंगी बोलताना सौ.साठे म्हणाल्या कि मला लहान पणापासूनच समाजकार्याची आवड होती. माझे पती श्री.अजित साठे यांनीही मला माझ्या या कार्यात सतत प्रोत्साहन व पाठबळ दिल्याने माझे हे कार्य मी अखंडपणे चालू ठेवण्यात यशस्वी झाले आहे.
सरकारी शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी हे गोरगरीबांची मुले असतात. त्या शाळांना सर्वच भौतीक सुविधा उपलब्ध होत नसतात. त्यामुळे शाळांची भौतिक साधनांची गरज लक्षात घेऊन आपणही या मुलांसाठी काहीतरी करावं असा विचार माझ्या मनात आला. स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनावेळी होणारे तालबद्ध संचलन आणि सामुदायिक कवायत माझ्या आवडीचे असल्याने या उपक्रमाला उपयोगी पडेल असे संगीत साहित्य म्हणून ढोल देण्याचे ठरवले.
प्राथमिक शाळेतच मुलांच्या अंगी असणाऱ्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांचे शिक्षण आनंददायी व्हावे यासाठी दहा उपक्रमशील शाळांची निवड करून त्यांना आज ढोल वाटप करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या पोथरे , जातेगाव , पांडे ,खडकेवाडी , आळजापूर , करंजे ,पिंपळवाडी आणि नगरपरिषदेच्या शाळा क्रमांक ४ व कै .सा .ना जगताप मुला मुलींची शाळा तसेच नोबल इंग्लीश स्कूल करमाळा या शाळांना या ढोलचे वाटप सौ.मनिषा साठे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सौ.टांगडे मॅडम यांची मुख्याध्यापिका म्हणून नियुक्ती झालेबद्दल सौ.साठे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तर जिल्हा परिषद शाळांच्या वतीने करंजे शाळेचे मुख्याध्यापक .श्री.लष्कर सर यांच्या हस्ते सौ.साठे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी श्नी. शकूर शेख सर यांनी आपल्या भाषणातून सौ.साठे मॅडम यांच्या आपल्या मुलीचा वाढदिवस मूक बधिर शाळेतील मुलांसमवेत , अपंगासाठी सायकल वाटप करून तर स्वतःचा वाढदिवस अनाथाश्रमातील लोकांना आवश्यक साहित्याचे वाटप करून समाजासमोर अनुकरणीय असा आदर्श निर्माण करणाऱ्या साठे कुटुंबियांच्या कौतुकास्पद कार्याचे कौतुक करून त्यांना दिर्घायुष्य लाभो अशी ईच्छा व्यक्त केली. यावेळी श्री.गभाले सर , श्री.लष्कर सर ,सौ.टांगडे मॅडम आणि श्री.चौधरी सर यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संतोष माने सर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.मुकुंद मुसळे सर आणि श्री.बाळू दुधे सर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार श्रीमती भोसले मॅडम यांनी मानले.
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…