Categories: करमाळा

दत्तकला शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री.राणादादा सूर्यवंशी यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाद्वारे मोठ्या उत्साहात आनंदात साजरा

करमाळा प्रतिनिधी जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले तोचि साधू ओळखावा देव तेथिची जाणावा जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा म्हणून काम करणारे दत्तकला शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री.राणादादा सूर्यवंशी यांच्या 21 जुलै 2023 रोजी असलेला वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवुन मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करण्यात आला. निसर्गाप्रती असलेले प्रेम त्याची जोपासना करण्यासाठी स्वामी चिंचोली भिगवण येथील दत्तकला शिक्षण संस्थेमध्ये विविध प्रकारच्या रोपट्याचे वृक्षारोपण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. सामाजिक बांधिलकीचे भावनेतून कुरकुंभ ता. दौंड येथील अविश्री बाल सदन अनाथ आश्रमामधील मुलांना पावसाळी रेनकोटचे वाटप जीवनावश्यक किराणा साहित्याचे वाटप करण्यात येऊन त्यांच्या समवेत केक कापून मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, सचिव सौ. माया झोळ, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल बाबर तसेच संस्थेतील सर्व पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते. अनाथबालकांच्या त्यांच्या सुप्त गुणांना कलागुणांना वाव देण्यासाठी श्रावणबाळ अनाथ आश्रम येथील मुलांना संगीत साहित्याचे खाऊचे वाटप करण्यात आले. मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा मानून जीवनामध्ये काम करणाऱ्या राणा दादांनी आयुष्याच्या मावळतीला असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मायेचा हात देत निराधार असणाऱ्या वृद्धांना वाढदिवसाच्यानिमित्त येथील वृद्धाश्रमाला वृद्धांची तहान भागावी व त्यांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी 230 लिटरचा रेफ्रिजरेटर भेट देऊन ज्येष्ठ नागरिकांना फळांची वाटप केले. महिला सक्षमीकरणाच्या नुसत्या चर्चा करतो पण त्यांच्या विकासासाठी आपण काहीतरी केले पाहिजे आपण त्यांचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून पिढीत दुर्लक्षित महिलांसाठी व त्यांच्या मुलांसाठी काही करण्याची तळमळ म्हणून बोरी तालुका इंदापूर येथील पिढीत महिला वर्करच्या मुलांसाठी चालवण्यात येत असलेल्या बाल विकास केंद्र येथे शिकत असलेल्या मुलांना अधिक स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून दत्तकला शिक्षण संस्थेतर्फे 25 लिटरचा वाटर प्युरिफायर भेट म्हणून देण्यात आला तसेच मिठाईचे वाटप करण्यात आले. समाजातील शरीराने विकलांग असलेल्या माणुसकीचा हात म्हणून कऱ्हावागज ता. बारामती येथील निवासी मूकबधिर विद्यालयामध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी किराणा साहित्याचे वाटप करून मूकबधिर मुलांच्या समवेत केक कापून मुलांना खाऊचे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. ज्या प्रमाणे आपण इतिहासात दाखले देतो संत तुकाराम महाराज हे अतिशय श्रीमंत होते, जमीनदारी वतनदारी जमीन जुमला भक्कम होता, त्याच्या पुढे जाऊन हे देखील सांगितल्या जाते की तुकारामांनी वैचारिक दृष्ट्या प्रबळ व विज्ञानवादी समाज उभा करण्यासाठी मोठे योगदान दिले, तद्नंतर ही गोष्ट आवर्जून सांगितली जाते की त्यांनी भुकमारी व दुष्काळाच्या वेळेस आपल्या घरातील धान्याच्या कोठारी जनते साठी खुल्या करून दिल्या होत्या, आज काळ खुप सोसवलाय जेणेकरून मी माझ आणि सर्वकाही माझ्या साठी असल्या भावनेच्या दुनियेतही श्री. राणादादा सुर्यवंशी एक असे व्यक्तिमत्व आहे .जे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत तुकाराम, गाडगे बाबा, तुकडोजी महाराज या महापुरुषांच्या दिलेल्या शिकवणीनुसार समाजाच्या सर्वांगिंण विकासासाठी कल्याणासाठी काम करत आहे सदर कार्यक्रमाप्रसंगी दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रतिनिधी डॉ. सचिन बेरे, श्री. संदीप शहाणे, प्रा. जीवनकुमार सोडल, प्रा. प्रिती काळे, प्रा. विपुल त्रिवेदी, प्रा. स्नेहल जमदाडे, सौ. ज्योती झोरे, प्रा. पूजा बनसोडे, प्रा. रोहन जाधव, श्री. रियाज शेख, कु. सोनाली बेलदार तसेच तालुक्यातील अधिकारी व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची गुरुकिल्ली -साध्वी प.पू अनुराधा दिदी शेटे पंढरपूरकर

करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…

1 day ago

भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देवळाली येथे नेत्ररोग तपासणी संपन्न

करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…

2 days ago

अवैध वाळु उपसा बंद करा आमदार नारायण पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पञ

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…

2 days ago

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

3 days ago

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

5 days ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

5 days ago