करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय काँग्रेस आय कमिटी ओबीसी विभाग तालुका संघटक पदी वाशिंबे गावचे माजी सरपंच भगवानराव डोंबाळे यांची निवड करण्यात आली आहे.काँग्रेस आय तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय काँग्रेस ओबीसी विभागाचे तालुकाध्यक्ष गफूरभाई शेख यांनी पत्र देऊन केली आहे सदर निवडीचे पत्र करमाळा काँग्रेस आय तालुकाध्यक्ष प्रतापराव नामदेवराव जगताप यांच्या हस्ते निवडीचे पत्र पुष्पगुच्छ हार फेटा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.निवडीनंतर भगवानराव डोंबाळे म्हणाले की काँग्रेस आय तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांचे कार्य विचारसरणी आपणास पटल्यामुळे आपण काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून वाशिंबे गावचा पाच वर्ष सरपंच म्हणून कामाचा अनुभव असल्या कारणाने गाव तेथे काँग्रेसची शाखा काढण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असून तालुकाध्यक्ष प्रताप जगताप यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष गफुरभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्ष वाढीसाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या कार्यक्रमास तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप ओबीसी सेल तालुकाध्यक्ष गफूरभाई शेख तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष संभाजी शिंदे अल्पसंख्यांक अल्पसंख्यांक सेल तालुकाध्यक्ष जावेद भाई शेख तालुका उपाध्यक्ष दादासाहेब कुदळे काँग्रेस आय अल्पसंख्यांक सेल जिल्हा उपाध्यक्ष दस्तगीर पठाण तालुका उपाध्यक्ष अशोक घरबुडे काँग्रेस आय शहराध्यक्ष सुजय जगताप तालुका उपाध्यक्ष रमजान मुलाणी तालुका उपाध्यक्ष साहिल भाई सय्यद तालुका उपाध्यक्ष ओबीसी सेल इकबाल भाई शेख महादेव कुदळे अर्जुन मदने सुलतान शेख निलेश चव्हाण नितीन चोपडे उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार नितीन चोपडे यांनी मानले.