करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील युवकांना प्रहार शेतकरी संघटना करमाळ्याच्या वतीने प्रहार चे तालुका उपाध्यक्ष सोमनाथ जाधव यांनी केले आहे. आजची तालुक्यातील राजकीय परिस्थिती पाहता विकास कामावर बारकाईने लक्ष ठेवून तालुक्यातील कामे ही नियमानुसार होतात का पाहावे.करमाळा तालुक्यात सरकारकडून लाखो, करोडो रुपये निधी देऊन विविध योजना अंतर्गत मग ते रस्ते, विज, पाणी, बांधकाम असे कामे येत असतात परंतु या कामावर तालुक्यातील कोणाचाही अंकुश नसल्यामुळे निकृष्ट दर्जाचे कामे होत आहेत. व सर्व आपल्या भरलेल्या टॅक्स मधला पैसा ठराविक माणसांची घरे भरण्यासाठी जात आहे एक तर हे कामासाठी निधी मिळून आणण्यासाठी वर्षानुवर्षे वाट बघावी लागते आणि आपण आलेल्या कामावर लक्ष दिले नाही तर एक वर्षाच्या आत सर्व कामे झाले होते का नाही अशी परिस्थिती होते लोकप्रतिनिधी अधिकारी यांची ठेकेदाराकडून होणारे कामावर दुर्लक्ष व डोळे झाक करताना दिसतात. त्यामुळे ही जबाबदारी आता तालुक्यातील सुजान नागरिक व युवकांनी स्वतः लक्ष घालून विकास काम दर्जेदार होण्यासाठी इस्टिमेट नुसार खरंच होतात का ही बारकाईने नजर ठेवून बघण्याची वेळ आली आहे. तरी आपण सर्वांनी कामे इस्टिमेट नुसार होतात का याची बारकाईने बघावे व काही अडचण आल्यास सोमनाथ जाधव मो. नं. 97 30 26 75 62 यावर संपर्क साधावा किंवा त्या कामाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार करावी असे आव्हान प्रहार शेतकरी संघटना करमाळ्याच्या वतीने केले आहे.