Categories: करमाळा

अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांना पहिली ते आठवीपर्यंतची शिष्यवृत्ती पुन्हा लागू करण्याची भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम फाउंडेशनची मागणी

करमाळा प्रतिनिधी अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांचा सामाजिक आर्थिक शैक्षणिक प्रगतीसाठी पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती दिली जाते . केंद्र सरकारच्या 29 नोव्हेंबर 2022 च्या निर्णयानुसार गतवर्षी पासुन पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती बंद झाली आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक फटका बसला आहे.त्यात महाराष्ट्रतील 7 लाख 34 हजार 819 विद्यार्थ्यांना 81 कोटी 65 लाख रुपये मिळाले आहे. अल्पसंख्याक समाजातील मुस्लिम,शीख,जैन, बौद्ध, पारसी, समाजातील शासकीय व निमशासकीय खासगी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी प्री मॅट्रिक व पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली होती.पहिली ते दहावीपर्यंत विद्यार्थ्यांनांचे गळतीचे प्रमाण कमी व्हावे हा त्यामागे उद्देश होता.मात्र गतवर्षी पासुन पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती बंद करण्यात आली आहे.अनेक अल्पसंख्याक विद्यार्थ्यी उर्दू माध्यमातून शिक्षण घेत आहे परंतु पहिली ते आठवीपर्यंत बंद झाल्याचा सर्वाधिक फटका उर्दू माध्यमाच्या शाळांना बसला आहे शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांच्या संख्येत व उपस्थित वाढ झाली होती.म्हणुन बंद झालेली शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करण्यात यावी अशी मागणी भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन करमाळा ही केंद्र शासन व महाराष्ट्राशासनास आवाहन करत आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.रामदास झोळ सर वाढदिवस विशेष लेख – श्रीकांत साखरे

आदरणीय प्रा. रामदास झोळ सरांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!काही माणसं आयुष्यात फक्त भेटत नाहीत… तर आयुष्य…

22 mins ago

शासकीय दाखले देण्यासाठी प्रत्येक विद्यालयात कॅम्प घ्या – गणेश चिवटे यांची मागणी

  करमाळा (प्रतिनिधी) – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या शासकीय दाखल्यांसाठी होणारी गैरसोय…

10 hours ago

करमाळा तालुक्यात मतदार यादी अचूक करण्यासाठी SIR मॅपिंग मोहिमेला वेग; तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांचे नागरिकांना सक्रिय सहभागासाठी आवाहन

करमाळा प्रतिनिधी. करमाळा विधानसभा मतदारसंघात सखोल मतदार पुनर्निरीक्षण (SIR) कार्यक्रम अंतर्गत मतदार यादी अचूक करण्यासाठी…

20 hours ago

करमाळ्यात 15 ते 21 मे दरम्यान स्नेहगंगामाई आळंदीकर यांच्या शिव महापुराण कथेचे भव्य आयोजन – श्रेणिकशेठ खाटेर*

* करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती व संत गजानन महाराज मंदिर समिती…

2 days ago

खासगी शाळेच्या संदर्भात चुकीची अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार – जिल्हा अध्यक्ष संभाजी घाडगे

सोलापूर प्रतिनिधी शासनाच्या पगारी घेणाऱ्या सर्व शिक्षकांनी नेमणुकीच्या ठिकाणी राहणे अपेक्षित आहे असे होत नाही…

2 days ago

नामसाधना मॉडर्न स्कूलमध्ये ‘हॉर्स रायडिंग’चा दिमाखात शुभारंभ; जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधांसह प्रवेश प्रक्रिया सुरू!

​ ​करमाळा प्रतिनिधी  शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील नामांकित 'नामसाधना मॉडर्न स्कूल'…

2 days ago