देवळाली ता.करमाळा (वय १७) येथील नामवंत युवा मल्ल पै.प्रथमेश रमेश शिंदे हा महाराष्ट्र केसरी चंद्रहास निमगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली जेऊरवाडी ता.करमाळा येथील शिवशंभो कुस्ती संकुलात वयाच्या १३ व्या वर्षांपासून मल्लविद्येचे शिक्षण घेत होता आता तो काका पवार कुस्ती संकुल पुणे येथे कुस्तीचे धडे घेत आहे.तो खूप मेहनती व जिद्दी आहे. त्याच्या अंगात खूप चपळाई व चिकाटी आहे.त्याने आत्ता पर्यंत विविध ठिकाणी कुस्त्यांच्या मैदानात अनेक पैलवानांना चितपट केले आहे. तशीच त्याची महाराष्ट्र केसरीच्या दृष्टीने वाटचाल चालू आहे. दरम्यान त्याला काही दिवसापूर्वी गुडघ्याला दुखापत झाली होती म्हणुन पुणे येथील दिनानाथ मंगेशकर, हॉस्पिटल येथे दाखल केले होते. त्यानंतर तेथील डॉक्टरांनी प्रथमेश वर गुडघ्याचे रिप्लेंसमेंट ही शस्त्रक्रिया करावी लागेल असे सांगितले होते व त्याचा खर्च दोन लाख रुपये होता. प्रथमेश चे वडील रमेश शिंदे हे करमाळा शहरात टेलरींग चा व्यवसाय करतात. अगोदरच प्रथमेशच्या मल्लविद्येच्या शिक्षणाचा महीन्याचा खर्च अधिक असल्यामुळे सदरील वैद्यकीय खर्च त्यांना परवडणारा नव्हता. त्यामुळे त्यांनी करमाळा तालुका शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे सहकक्षप्रमुख शिवकुमार चिवटे यांच्याशी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळण्यासाठी संपर्क साधला होता.त्यावेळी चिवटे यांनी प्रथमेशच्या वडिलांना आवश्यक ते कागदपत्रे सांगून करमाळा येथील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कार्यालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यक लक्ष्मण सुरवसे सर यांच्या मार्गदर्शनाने मदतीसाठी अर्ज केला होता.
त्यानंतर या अर्जां संबंधी प्रथमेश च्या वडिलांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्याशी भेटून प्रकरण सांगितले होते.त्याच क्षणी मंगेश चिवटे म्हणाले की वैद्यकीय मदत तर मिळेलच पण माझे आजोबा करमाळा नगर परिषद चे माजी नगराध्यक्ष व स्वातंत्र्य सैनिक कै.मनोहरपंत चिवटे हे देखील कुस्तीप्रेमी होते तसेच त्यांना स्वतःला व्यायामाची खूप आवड होती व त्यातूनच त्यांनी बलाढ्य शरीरसंपदा कमावली होती.त्यांच्यानंतर मंगेश चिवटे यांचे चुलते कै.प्रकाश मनोहरपंत चिवटे व अनिल सदाशिव चिवटे यांनी देखील व्यायाम व कुस्तीचा वारसा जपला.चिवटे यांच्या पुढील पिढीत स्वतः मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी देखील कोल्हापूर येथे काही महिने त्यांचे चुलत बंधू जयराज व गजराज चिवटे यांच्या समवेत मल्ल विद्येचे शिक्षण घेतले होते.पण देवाने त्यांच्या हातून वेगळेच काहीतरी करून घ्यायचे ठरवले होते जे की आज उभा महाराष्ट्र त्यांचे कार्य बघतोय.भा.ज.पा चे करमाळा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे हे सुद्धा आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी जीन मैदान, करमाळा येथे निकाली कुस्त्यांचे मैदान भरवत असतात यात राष्ट्रीय स्तरावरील मल्ल सहभागी होतात.
याशिवाय सोलापूर शिवसेना जिल्हाप्रमुख महेश(दादा)चिवटे यांनी देखील मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष मंत्रालय, मुंबई च्या कार्यालयातील स्वरूप काकडे सर यांच्या कडे पाठपुरावा करून पन्नास हजार रुपये वैद्यकीय मदत निधी सदरील खर्चास मिळवून दिला. यातूनच चिवटे परिवाराचे लाल माती विषयी असलेला आदर दिसून येतो.
प्रथमेश च्या कुटुंबाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, खा.डाॅ.श्रीकांत शिंदे व मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे कक्ष प्रमुख रुग्णसेवक मंगेश चिवटे यांचे आभार मानले.तसेच या कामी विशेष सहकार्य केलेले पुणे येथील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे समन्वयक राजू शेठ करजखेडे तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यक ऋषिकेश देशमुख सर, अरविंद मांडवकर सर,रविंद्र ननावरे सर व दिपाली चव्हाण मॅडम यांना धन्यवाद दिले. तसेच रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून काम करणाऱ्या महाराष्ट्रातील संपूर्ण शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या टीम चे कौतुक केले.
करमाळा प्रतिनिधी १५ ते २० देशांतून भ्रमंती करून ज्ञानसंग्रह करणारे राहुल रसाळ आणि गेल्या ५०…
माणसाने निवृत्त झाल्यावर एकत्रित येऊन जुन्या आठवणींना उजाळा आणि मैत्रीचे नूतनिकरण करण्याची आलेली सुवर्णसंधी दवडायची…
करमाळा प्रतिनिधी जेष्ठ संसदपटू असलेले अटलबिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते.असे मत भारतीय जनता…
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…