Categories: करमाळा

करमाळा येथील दुय्यम निबंधक कार्यालयाच्या बांधकामासाठी 1 कोटी 69 लाख निधी मंजूर – आमदार संजयमामा शिंदे

करमाळा प्रतिनिधी
करमाळा येथे दुय्यम निबंधक श्रेणी 1 या कार्यालयाच्या बांधकामासाठी 1 कोटी 69 लाख 18 हजार 705 रुपये निधी मंजूर झाला असून सदर इमारतीच्या बांधकामासाठी आज दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आ. संजयमामा शिंदे यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देताना आमदार संजयमामा शिंदे म्हणाले की, करमाळा येथील सर्वच प्रशासकीय कार्यालयांच्या इमारती मोडकळीस आलेल्या असून करमाळा येथे सर्व शासकीय कार्यालयांचे एकत्रित करण करून त्याच्या प्रशासकीय संकुल बांधकामासाठी आपण तत्कालीन महाविकास आघाडी सरकारकडे 25 कोटी रुपये निधीची मागणी केलेली असून त्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. भविष्यकाळामध्ये प्रशासकीय संकुलाची इमारत उभी राहील.तत्पूर्वी सहाय्यक निबंधक कार्यालयाची इमारतही मोडकळीस आलेली होती त्यासाठी आपण स्वतंत्रपणे निधीची मागणी केली होती त्यानुसार सदर निधी मंजुरीची प्रशासकीय मान्यता मिळाली असल्यामुळे लवकरच सहाय्यक निबंध कार्यालयाचे बांधकाम सुरू होईल.
आत्तापर्यंत आपण करमाळा शहरामध्ये करमाळा उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामासाठी 25 कोटी रुपये तसेच उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी वसाहतीसाठी 18 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला असून त्याचे बांधकाम सध्या प्रगतीपथावर आहे तसेच करमाळा शहराच्या वैभवामध्ये भर घालणारी नगरपरिषदेची इमारत, सांस्कृतिक सभागृह व छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा यासाठी 10 कोटी रुपये निधी मंजूर आहे त्याची बांधकामेही लवकरच सुरू होतील.करमाळा शहरांमध्ये आपल्या कार्यकाळामध्ये आतापर्यंत बांधकामासाठी तब्बल 55 कोटी निधी मंजूर झालेला आहे व त्या माध्यमातून बांधकामेही सुरू आहेत. तसेच करमाळा तालुक्याचे आराध्य दैवत असलेल्या कमला भवानीच्या परिसर विकासासाठी 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला होता त्यामधून विविध बांधकामे सुरू आहेत .एकूणच करमाळा शहराचा व परिसराचा चेहरा मोहरा बदलण्याच्या दृष्टीने हा निधी महत्त्वाचा ठरणार आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

10 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

13 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

15 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago