Categories: करमाळा

सुरताल संगीत विद्यालयाच्यावतीने २०ॲागस्ट रोजी करमाळ्यात संगीत नृत्य महोत्सव

करमाळा प्रतिनिधी कमला भवानी बहुउद्देशीय संस्था संचलित सुरताल संगीत विद्यालयाच्या वतीने दि. 20 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 5.00 वाजता विकी मंगल कार्यालय करमाळा येथे संगीत आणि नृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
दरवर्षीप्रमाणे पं विष्णू दिगंबर पलुस्कर आणि पं के एन बोळंगे गुरुजी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून उत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्या बरोबरच वेगवेगळ्या राज्यातील तसेच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गायक व नृत्य कलावंत उपस्थित राहणार आहेत. शास्त्रीय गायिका परामिता राॅय कोलकत्ता, मणिपुरी नृत्यांगणा नंदीतो कुहेलीका कोलकत्ता, कत्थक नृत्यांगना मौमिता चक्रवर्ती सिलिगुडी, ओडिसी नृत्यांगना सुजाता नायक कोलकाता, सत्रिय नृत्यांगना मंजूमनी बोराह गुवाहाटी, कुचीपुडी नृत्यांगना तेजस्विनी कलगा हैदराबाद, भरतनाट्यम नृत्यांगना सुदीपा सैन सिल कोलकत्ता, कथक नृत्यांगना डॉ अर्पिता चॅटर्जी कोलकत्ता इत्यादी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलाकार आपली कला सादर करणार आहेत. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना तसेच कलाकारांना संस्थे च्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच करमाळा येथील रसिकांना वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य पाहायला मिळणार आहेत. तरी रसिक श्रोत्यांनी या कार्यक्रमाचा आवर्जून लाभ घ्यावा असे प्राचार्य बाळासाहेब नरारे यांनी आव्हान केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago