Categories: करमाळा

प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठान करणार उपक्रमशील शिक्षकांचा सन्मान

करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षकांचा सन्मान शिक्षक दिनानिमित्त प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठान रावगाव ता. करमाळा ही संस्था करणार आहे यावेळी संस्थेच्या वतीने पुरस्कारार्थी शिक्षकांचा सन्मान शाल ,श्रीफळ, प्रशस्तीपत्र, व सन्मान चिन्ह देऊन केला जाणार आहे यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा .रामदास कांबळे बोलताना म्हणाले की, शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील शिक्षण मुलांचे शिक्षण प्रक्रियेतील पाया असून हा पाया मजबूत करण्याचे कार्य हे शिक्षक करत असतात ज्या वयामध्ये या मुलांना जीवन जगण्याचे ज्ञान नसताना हे शिक्षक मुलांना जगण्याचे व ज्ञानाचे धडे देऊन उद्याच्या विशाल जगात मार्गक्रमण करण्यासाठी त्यांच्या जीवनाचा पाया मजबूत करण्याचे कार्य हे शिक्षक करत असतात म्हणून प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानने तालुक्यातील उपक्रमशील शिक्षकांचा सन्मान करण्याचे ठरवले आहे तरी शिक्षकांनी आपले प्रस्ताव ३१ ऑगस्ट पर्यंत संस्थेकडे पाठवण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष मा. रामदास कांबळे (मो.नं.9359129373) यांनी म्हटले आहे .

saptahikpawanputra

Recent Posts

दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.रामदास झोळ सर वाढदिवस विशेष लेख – श्रीकांत साखरे

आदरणीय प्रा. रामदास झोळ सरांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!काही माणसं आयुष्यात फक्त भेटत नाहीत… तर आयुष्य…

5 hours ago

शासकीय दाखले देण्यासाठी प्रत्येक विद्यालयात कॅम्प घ्या – गणेश चिवटे यांची मागणी

  करमाळा (प्रतिनिधी) – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या शासकीय दाखल्यांसाठी होणारी गैरसोय…

15 hours ago

करमाळा तालुक्यात मतदार यादी अचूक करण्यासाठी SIR मॅपिंग मोहिमेला वेग; तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांचे नागरिकांना सक्रिय सहभागासाठी आवाहन

करमाळा प्रतिनिधी. करमाळा विधानसभा मतदारसंघात सखोल मतदार पुनर्निरीक्षण (SIR) कार्यक्रम अंतर्गत मतदार यादी अचूक करण्यासाठी…

1 day ago

करमाळ्यात 15 ते 21 मे दरम्यान स्नेहगंगामाई आळंदीकर यांच्या शिव महापुराण कथेचे भव्य आयोजन – श्रेणिकशेठ खाटेर*

* करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती व संत गजानन महाराज मंदिर समिती…

2 days ago

खासगी शाळेच्या संदर्भात चुकीची अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार – जिल्हा अध्यक्ष संभाजी घाडगे

सोलापूर प्रतिनिधी शासनाच्या पगारी घेणाऱ्या सर्व शिक्षकांनी नेमणुकीच्या ठिकाणी राहणे अपेक्षित आहे असे होत नाही…

2 days ago

नामसाधना मॉडर्न स्कूलमध्ये ‘हॉर्स रायडिंग’चा दिमाखात शुभारंभ; जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधांसह प्रवेश प्रक्रिया सुरू!

​ ​करमाळा प्रतिनिधी  शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील नामांकित 'नामसाधना मॉडर्न स्कूल'…

3 days ago