Categories: करमाळा

करमाळा तालुका किसान काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्षपदी मोरवड तालुका करमाळा येथील दादासाहेब कुदळे यांची निवड


करमाळा प्रतिनिधी – करमाळा तालुका किसान काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्षपदी मोरवड तालुका करमाळा येथील दादासाहेब कुदळे यांची निवड माढा लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक खासदार हुसेनजी हलवाई साहेब व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा सहनिरीक्षक मोहनजी जोशी साहेब, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर धवल सिंह मोहिते पाटील, सोलापूर जिल्हा किसान काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष श्री राहुल कौलगे-पाटील, करमाळा काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप, यांच्या प्रमुख उपस्थितीत अकलूज येथील धवल श्रीराम मंदिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या माढा लोकसभा पूर्वतयारी बैठकीच्या कार्यक्रमात करण्यात आली. शेतकऱ्यांच्या अडी- अडचणी जाणून घेऊन त्यांना योग्य ती मदत करण्याचा प्रयत्न हा माझा राहणार असून लवकरच करमाळा तालुका किसान काँग्रेस कमिटीची कार्यकारणी तयार करून संपूर्ण तालुक्यामध्ये शाखा विस्तार करून काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे साहेब, श्रीमती सोनियाजी गांधी, देशाचे भावी पंतप्रधान माननीय राहुलजी गांधी, माननीय प्रियंका जी गांधी, यांचे विचार खेड्यातील घराघरापर्यंत पोहोचून काँग्रेस पक्ष बळकट करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नूतन करमाळा तालुका किसान काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष दादासाहेब कुदळे यांनी सांगितले. यावेळी करमाळा तालुका काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी आपल्या मनोगतात करमाळा तालुका हा पूर्वीपासून काँग्रेस पक्षावर अतोनात प्रेम करणारा तालुका आहे. स्वर्गीय नामदेवरावजी जगताप साहेब यांचा वारसा पुढे चालवत असताना साहेबांना अभिप्रेत असलेले 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण हे सूत्र डोळ्यासमोर ठेवून प्रामुख्याने समाजातील उपेक्षित वर्गाला न्याय देण्याचा प्रयत्न हा माझा नेहमीच राहिला असून यापुढील काळातही काँग्रेस पक्षाला पूर्वीसारखे गत वैभव प्राप्त करून देण्याचा माझा संकल्प असल्याचे श्री प्रतापराव जगताप यांनी सांगितले. करमाळा तालुका किसान काँग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्षपदी दादासाहेब कुदळे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार माढा लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक खासदार हुसेनजी दलवाई साहेब महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा सहनिरीक्षक मोहनजी जोशी साहेब, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते- पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला. व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी करमाळा तालुका ओबीसी सेल तालुकाध्यक्ष गफूरभाई शेख, करमाळा तालुका युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुजय जगताप, करमाळा तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अशोक
घरबुडे, छगन मोहोळकर, करमाळा तालुका ओबीसी सेलचे उपाध्यक्ष भगवान डोंबाळे, प्रतीक जगताप, अशोक शिंदे, नितीन चोपडे, हर्षद काळे, दिनेश सालगुडे आदी उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

22 hours ago

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

2 days ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

3 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

3 days ago