Categories: करमाळा

दत्तकला शिक्षण संस्थेत चांद्रयान मोहिमेच्या यशस्वीतेबद्दल जल्लोष साजरा

करमाळा प्रतिनिधी 24 ऑगस्ट रोजी दत्तकला शिक्षण संस्थेत चांद्रयान 3 मोहिमेच्या यशस्वीतेबद्दल दत्तकला ग्रुप ऑफ स्कूलने आनंद साजरा केला. दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय प्रा. रामदास झोळ सर संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय श्री. राणादादा सूर्यवंशी साहेब दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिवा आदरणीय सौ.माया झोळ मॅडम तसेच दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी आदरणीय डॉ.विशाल बाबर सर यांच्या संकल्पनेतून या सुंदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या मनात आपल्या देशाबद्दल प्रचंड प्रेम माया आणि देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द निर्माण व्हावी तसेच दत्तकला शिक्षण संस्थेतील एखादा विद्यार्थी भारत देशाचा पुढे शास्त्रज्ञ बनावा हाच या उपक्रमाच्या मागचा हेतू होता आज या उपक्रमात चांद्रयान 3 मोहिमेबद्दल बरीच माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली चंद्रयान उड्डाण झाल्यापासून ते चंद्रावरती पोहोचायला त्याला किती वेळ लागला ही माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. भारतीय शास्त्रज्ञांनी सुरुवातीपासूनच पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण च्या मदतीने हे यान चंद्रावरती कसे पाठवले या चंद्रावरती पाठवण्याच्या मागचा उद्देश काय आहे हे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले .चंद्रावर दक्षिण ध्रुवाकडे जाणारा भारत हा जगातील प्रथम देश ठरला आहे .त्याचबरोबर पृथ्वीवरून चंद्रावर हे यान कसे पोहोचलं आणि पृथ्वीवरून चंद्रावरची एक बाजू कशी दिसते हे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवले. लॅन्डर कुठे उतरून त्याची कामगिरी कशी असेल चंद्रावरती थंड पाणी आहे का तसेच त्या पाण्यात खनिजे आढळतात का तिथली माती कशी आहे ही सर्व माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली यावेळी ग्रुप ऑफ स्कूलच्या डायरेक्टर सौ ताटे मॅडम दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य यादव मॅडम इन्चार्ज प्राध्यापक धेंडे सर इन्चार्ज प्रा खाडे मॅडम हे उपस्थित होते यावेळी चंद्रयानाची सर्व माहिती कदम मॅडम व खोमणे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना सांगितली सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी आनंदात हा उपक्रम साजरा केला.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

4 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago