करमाळा प्रतिनिधी – करमाळा दौऱ्यावर आलेले महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री मा.ना.श्री.शंभूराजे देसाई यांना गाळे भाडे माफ होणे व असंघटित कामगार यांना प्रतिमाह तीन हजार मानधन द्यावे याबाबत युवा सेना शहर प्रमुख विशाल गायकवाड यांनी निवेदन देण्यात आले आहे. सदर निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, संपूर्ण जगभरात कोरोनाच्या संसर्गजन्य आजाराने थैमान घातलेले असून यामुळे अनेक लोकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे . अशा परिस्थितीत सर्वसामान्य वर्गास आपल्या सरकारने अनेक मदतीचे हात दिलेले आहेत . सध्या लॉकडाऊन मुळे सर्व व्यवहार ठप्प झालेले असल्याने सर्व सामान्य वर्ग हा हतबल झालेल आहे . लॉकडाऊन उठल्यानंतरही सन २०२०-२१ मध्ये संपूर्ण उद्योग धंदे स्थिर होण्यास खुप अवधी लागणार आहे . त्यामुळे करमाळा नगरपरिषदेकडील गाळा धारकांना गाळे भाई भरणे अशक्यप्राय झालेले आहे . सबब सदर वर्षांचे पूर्ण गाळे भाडे माफ करणेबाबत आपले स्तरावरून कार्यवाही होणे अपेक्षित आहे . तसेच नोंदणीकृत असंघटीत कामगारांची कोणतीही युनियन अथवा संघटना नसल्याने त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे . आज कोरोनाच्या संकटात असंघटीत कामगार वर्ग हा पूर्णपणे निराश झालेला असून सदर कामगारांना प्रतिमाह रू . ३००० / – इतके मानधन देवन त्यांना पुनश्चः उभा करणेसाठी सर्वोतोपरी सहकार्य होणे आवश्यक आहे . तरी सदरकामी आपण आपले स्तरावरून संबंधितांना सुचना देवून सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा अशीही मागणी निवेदनाद्वारे विशाल गायकवाड यांनी केली आहे . यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, पंचायत समिती सभापती गहिनीनाथ ननवरे, युवा सेना उपतालुका प्रमुख दादासाहेब तनपुरे, अशोक रंदवे, हनुमंत रंदवे आदी शिवसैनिक उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…