करमाळा प्रतिनिधी 25 15 योजनेअंतर्गत करमाळा तालुक्यामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात 5 कोटी रुपये निधीची कामे मंजूर केलेली होती .सदर कामांपैकी 95 लक्ष निधी मंजूर असलेली कामे दिनांक 12 ऑक्टोबर 2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये रद्द झालेली होती. सदर कामे रद्द यादीतून वगळण्यात आल्याचा शासन अध्यादेश 24 ऑगस्ट 2023 रोजी निघालेला असून तालुक्यातील 95 लक्ष निधी मंजूर असलेली कामे होण्याचा मार्ग आता सुकर झाला असल्याची माहिती आ. संजयमामा शिंदे यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये मंजूर असलेली कामांच्या निविदा निघालेल्या नव्हत्या अशी 95 लक्ष निधीची कामे ऑक्टोबर 2022 मध्ये रद्द ठरविण्यात आली होती तो रद्द आदेश आता मागे घेतलेला असून सदर कामे 31 मार्च 2024 पर्यंत पूर्ण व्हावी असा आदेश निघालेला आहे .सदर निधीमधून मौजे घरतवाडी, कुंभारगाव, सावडी, आळजापूर, लव्हे, वांगी नं.1, वांगी नं.2, वांगी नं. 3 ,वांगी नं.4, पांगरे, सांगवी नं.2, कोळगाव, घोटी, सालसे, आवाटी, देवीचा माळ, कोंढार चिंचोली, कंदर व सातोली या 19 गावांमध्ये सामाजिक सभागृह ,गावांतर्गत व वाडीवस्तीवरील रस्ते मुरूमीकरण करणे ,गटर्स व इतर सोयी सुविधा पुरविणे आदी कामांसाठी प्रत्येकी 5 लक्ष याप्रमाणे निधी वितरित केला जाणार आहे. तरी संबंधित ग्रामपंचायतींनी ही कामे 31 मार्च 2024 पर्यंत पूर्ण करावीत असे आवाहन आमदार संजयमामा शिंदे यांनी केले आहे .
चौकट –
लवकरच 65 कोटी निधी मंजुरीचे आदेश येणार…
करमाळा मतदार संघाच्या भरीव विकासासाठी 25 15 योजनेतून 50 कोटी, वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नगरपरिषद विकासासाठी 10 कोटी व समाज कल्याण विभागाकडून 5 कोटी असे 65 कोटी निधी मंजुरीचे शासन अध्यादेश लवकरच निघतील अशी माहिती आ. शिंदे यांनी दिली.
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…