*करमाळा प्रतिनिधी
पावसाळा चालू होऊन तीन महिने संपत आले तरी करमाळा तालुक्यात सरासरी एवढा पाऊस झालेला नाही त्यामुळे तालुक्यावर दुष्काळाची छाया पसरलेली आहे ऐन पावसाळ्यात खरीप पिकांणी माना टाकलेल्या आहेत पिके करपून चाललेली आहेत त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे यावर्षी जून महिना पूर्णपणे कोरडा गेलेला आहे तर जुलैमध्ये जेमतेम पाऊस झाला होता पुढे पाऊस होईल या आशेवर शेतकऱ्यांनी खरीप पेरणी केली होती जवळ असलेल्या पैशातून बी बियाणे खते आणि कीटकनाशके यासाठी खर्च केला होता परंतु ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाने पाठ फिरवली त्यामुळे शेतकऱ्यांचे कष्ट वाया जाण्याच्या मार्गावर आहे अहोरात्र कष्ट करून देखील आत्ता शेतकऱ्यांच्या हाती निराशाच उरलेली आहे पुरेसा पाऊस झाला नसल्याने विहिरी आणि बोरवेल चे देखील पाणी कमी झालेले आहे. नदी, नाले, पाजरतलाव,ओढे देखील कोरडे पडलेले आहेत त्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे जनावरांना पिण्यासाठी पाणी आणि चाऱ्यांसाठी शेतकऱ्यांकडे आता पाणी आणि चारा शिल्लक राहिलेला नाही जनावरे सांभाळणे आता शेतकऱ्यांना अवघड झालेलं आहे यावर्षी पाऊस नसल्याने पिके करपून चाललेली आहेत अनेक शेतकऱ्यांची खरीपाची पिके येऊ शकत नाही असा अंदाज आल्यानंतर पिकात अक्षरशा पाळी घालून पिके मोडायला सुरुवात केलेली आहे तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील गावागावात निर्माण झालेला आहे यावर्षी पहिल्या तीन महिन्यात झालेल्या अपुऱ्या पावसाने शेतकऱ्यांना पिके जगवणे, जनावरे जगवणे मुश्किल झाले आहे महागाई वाढली आहे ज्या लोकांनी पिक विमा भरला आहे त्या पिकांचा शासनाने पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत करावी जनावरांना चारा पाणी उपलब्ध करून द्यावा तसेच दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी. अशी मागणी घारगावच्या सरपंच लक्ष्मी सरवदे यांनी केलेली आहे.
माणसाने निवृत्त झाल्यावर एकत्रित येऊन जुन्या आठवणींना उजाळा आणि मैत्रीचे नूतनिकरण करण्याची आलेली सुवर्णसंधी दवडायची…
करमाळा प्रतिनिधी जेष्ठ संसदपटू असलेले अटलबिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते.असे मत भारतीय जनता…
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…