करमाळा तालुक्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती… दुष्काळ जाहीर करून  सर्व शेतकऱ्यांना पिकाची सरसकट नुकसान भरपाई मिळावी -ॲड.राहुल सावंत

करमाळा प्रतिनिधी – यावर्षी पावसाने पाठ फिरविल्यामुळे दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे. सप्टेंबर महिना आला तरी पाऊस पडत नसल्याने व उत्पन्न येणारच नसल्याची खात्री झाल्याने करमाळा तालुक्यातील विविध ठिकाणचे शेतकरी यांची उडीद, तुर, बाजरी, मका, सोयाबीन, मूग, कांदा, सूर्यफूल, कपाशी अशी उभी पिके करपून गेल्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी एक लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी. त्यामुळे सरसकट दुष्काळ जाहीर करावा, तात्काळ दुष्काळी उपाययोजना द्याव्यात अशी मागणी पंचायत समिती सदस्य व हमाल पंचायत अध्यक्ष ॲड. राहुल सावंत यांनी केली आहे.
संपूर्ण पावसाळ्यात जून /जुलै महिन्यात एक दोन पाऊस वगळता संपूर्ण पावसाळा विना पावसाचा निघून गेला आहे. ऑगस्ट महिना संपायला येऊनही तालुक्यात चांगला व अपेक्षित पाऊसच झाला नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. कोरोनाच्या संकटातून बाहेर पडून मोठ्या उमेदीने आर्थिक भार उचलून शेतकर्‍यांनी शेती मशागत करून रब्बी व खरीप पिकांची लागवड केली. यावर्षी पाऊस चांगला पडेल व उत्पन्न चांगले येईल या आशेने शेतकर्‍यांनी कापूस, मूग, उडीद, मका, सोयाबीन, तुर , बाजरी, कांदा, सूर्यफूल अशा मुख्य पिकांची लागवड केली. महागडी बियाणे व कृषी निविष्ठा खरेदी करून शेतीची मेहनतीने मशागत केली.
परंतु जून महिन्यात पाऊसच न झाल्याने पहिली केलेली लागवड वाया गेली व आर्थिक संकटाचा भार पडला. मात्र जून, जुलै महिन्यात एक दोन पाऊस वगळता चांगला पाऊस झाला नाही. मात्र पावसाने पुन्हा पाठ फिरवून हुलकावणी दिली.
शेतकर्‍यांनी पिकांना जीवदान म्हणून महागडी खते व फवारणी देखील केली. मजूर लावून शेतीची मशागत देखील करून घेतली. जून पासून पाऊस नसल्याने व मे महिन्यासारखे कडक उन्हाळ्याचे ऊन पडत असल्याने खरीपाचे पिके ही उन्हाने कोरडी व जळत जाऊ लागलीत. त्या पिकांची खुंटलेली वाढ होणार नाही व उत्पन्न येणार नसल्याचे लक्षात घेऊन शेतकर्‍यांनी लागवड केलेली पिकांची उभे पीक करपून गेल्यामुळे वखरणी करून काढून टाकुन दिली आहे.
काही शेतकर्‍यांनी बटई व उक्ते पध्दतीने शेती केली. त्यात त्यांना डबल आर्थिक फटका बसला आहे. पावसाच्या अडीच ते तीन महिन्यांच्या मोठ्या दडीमुळे खरीप पिकांची मोठी हानी होऊन संपूर्ण हंगामच वाया गेल्याने शेतकर्‍यांची आर्थिक गोची निर्माण झाली आहे. परिणामी कुंटुंबाचा गाडा कसा हाकलावा असा प्रश्‍न शेतकर्‍यांसमोर उभा ठाकला आहे. पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. परिस्थितीची गंभीरता ओळखून व महागाई  लक्षात घेऊन शेतकर्‍यांना सरसकट हेक्टरी एक लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी तसेच कोरडा दुष्काळ जाहीर करून सोबत काढलेल्या पीक विम्याची संपूर्ण भरपाई रक्कम तात्काळ शेतकर्‍यांना देऊन त्यांच्या ह्या आर्थिक संकटात निःपक्षपातीपणे मदत करावी अशी मागणी ॲड. राहुल सावंत यांनी केली . हे निवेदन मा . मुख्यमंत्री, मा . उपमुख्यमंत्री, मा. पालकमंत्री , मा. कृषिमंत्री , मा. विरोधी पक्षनेते, मा. आमदार, मा . जिल्हाधिकारी, मा. तहसीलदार
यांना देण्यात आले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची गुरुकिल्ली -साध्वी प.पू अनुराधा दिदी शेटे पंढरपूरकर

करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…

23 hours ago

भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देवळाली येथे नेत्ररोग तपासणी संपन्न

करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…

2 days ago

अवैध वाळु उपसा बंद करा आमदार नारायण पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पञ

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…

2 days ago

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

3 days ago

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

5 days ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

5 days ago